![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
इंडियन हैडलाइन न्यूज़/ तुमसर प्रतिनिधि
छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान, तुमसर च्या वतीने दि. 12 जानेवारी ला राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती राष्ट्रीय युवा दिवस साजरा करण्यात आला. या वेळी कार्यक्रमाची सुरुवात माता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे दीपप्रज्वलन, पूजन व माल्यार्पणाने करण्यात आली. यावेळी प्रतिष्ठान चे संस्थापक /अध्यक्ष इंजि. नितीन धांडे व प्रतिष्ठान चे सचिव प्रा. अमोल उमरकर यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी प्रतिष्ठान चे उपाध्यक्ष विक्की साठवणे, युवनेश धांडे, श्रेयश शेंडे, तुषार बावांथडे, कुणाल गभणे, समीर पडोळे, रितेश भेलावे, दिपाली मते, पूजा सिंगंजुडे, खुशी भोयर, वैष्णवी चौधरी, रिया तुमसरे, पूनम गायधने, फाल्गुनी शेंडे व छत्रपती शिवाजी महाराज वाचनालयाचे सभासद, विद्यार्थी व इतर उपस्थित होते.