![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
इंडियन हैडलाइन न्यूज़/ तुमसर प्रतिनिधि
16 जानेवारी 1681 रोजी स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक मोठ्या थाटात पार पडला त्या दिवसाची आठवण म्हणुन दिनांक 16 जाने. 2025 रोज गुरूवार ला संध्याकाळी 7.00 वाजता छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान तुमसर च्या वतीने हा दिवस राज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. या वेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान तुमसर चे संस्थापक/अध्यक्ष इंजि. नितीन धांडे प्रतिष्ठान चे सचिव प्रा. अमोल उमरकर , प्रमोद देशमुख, समीर पडोळे, रितेश भेलावे, तुषार बावनथडे, दीपाली मते, खुशी भोयर, पूजा सिंगंजुडे, इत्यादी उपस्थित होते.