![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
इंडियन हैडलाइन न्यूज़/ तुमसर प्रतिनिधि
तुमसर: ब्रिटिश राजवटीला न जुमानता समाज प्रबोधन करणाऱ्या बाळशास्त्री जांभेकरांमुळे खऱ्या अर्थाने पत्रकारतेची मुहूर्तमेढ रोवली. त्यांनी निर्भीड आणि निस्वार्थ भावनेने समाजातील वास्तव मांडले. आजच्या पत्रकारांनीही समाजातील खरे वास्तव मांडून निर्भीड पत्रकारितेतून लोकशाहीचा चौथा स्तंभ बळकट करावा, असे आवाहन तुमसर चे तहसिलदार मोहन टिकले यांनी केले.
तुमसर तालुका प्रेस वेलफेअर असोसिएशन तर्फे आज दी 6 जानेवारी रोजी येथिल हॉटेल पंचशील येथे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी तुमसर चे प्रसिध्द शल्यचिकित्सक डॉ. गोविंद कोडवानी, प्रेस असोसिएशन चे प्रभारी अध्यक्ष प्रा. राहूल डोंगरे हे उपस्थित होते.
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरवात झाली. डॉ . कोडवानी म्हणाले ‘‘स्वातंत्र्यापूर्वी या देशात ब्रिटिशांची जुलमी राजवट सुरु होती. मात्र, त्यांच्या या जुलमी राजवटीच्या विरोधात बाळशास्त्री जांभेकर यांनी आवाज उठवत आपल्या दैनिकातून प्रबोधनाचे करून समाजाला आरसा दाखविण्याचे कार्य केले. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ खऱ्या अर्थाने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी जगासमोर आणला. त्यांनी ब्रिटिश राजवटीमध्ये खऱ्या अर्थाने लोकशाही जागवली. जांभेकर यांनी जो पायंडा घालून दिला, तो आजही इथला पत्रकारांनी जपला आहे. असे गौरवउद्गार केले . कार्यक्रमाचें संचालन तालुका प्रेस असोसिएशन चे सचिव अनिल कारेमोरे यांनी मानले तर उपस्थितांचे आभार राहूल भुतांगे यांनी मानले. कार्यक्रमाला उपाध्यक्ष देवचंद टेंभरे, महेश गायधने, रोहित बोंबार्डे, सीताराम शर्मा, जीवन वणवे, संजय नेमाडे, हर्षल खडसे, लालू चरडे, धनजय बडवाईक, नवनीत जोशी, तुषार कमल पशिने आदी उपस्थित होते.