![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ लाखनी प्रतिनिधि
लाखनी: श्री भगवान सहस्त्रबाहू कलार सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या कलार समाज स्नेहमिलन व सत्कार सोहळ्यात समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
अध्यक्षस्थानी माजी जि. प. सदस्य डॉ. सुदाम शहारे, विशेष अतिथी म्हणून श्याम पाटील खेडीकर, शिखा पिपरेवार, अॅड. कीर्ती जयस्वाल, डॉ. विनोद लांजेवार, फाल्गुण उके, संगीता ठलाल, संजय चड? गुलवार, दुर्योधन मांडवे, तुषार कमल पशिने, गायत्री लाडे आदी उपस्थित होते. सत्कारमूर्ती म्हणून राज्यमंत्री आशिष जयस्वाल व महिला बालकल्याण सभापती अनिता नलगोपूलवार यांचा समावेश होता.
कार्यक्रमात युवक-युवती परिचय मेळावा, सामूहिक विवाह सोहळा आणि मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला. तसेच समाजातील शैक्षणिक, राजकीय, व्यवसायिक तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. महिलांनी हळदी-कुंकू व वाण वाटप तसेच अनाथ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप करण्यात आले.
प्रास्ताविक व संचालन सचिन उके यांनी तर वाल्मिक लांजेवार यांनी आभार मानले. यशस्वितेसाठी अनिल बडवाईक, दत्ता पोहरकर, चिंतामण लाडे, गुलाब लांजेवार, सुहास बोरकर आदीनी सहकार्य केले.