![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ तुमसर प्रतिनिधि
तुमसर :- कॉपीमुक्त अभियानामुळे परीक्षा तणावरहीत वातावरणात पार पाडता येईल .या अभियानामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. परीक्षेला समोर जाताना मंडळ सूचनाचे व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. मी सातत्याने अभ्यास करीन व प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव करेन , तसेच परीक्षेत आत्मविश्वासाने, निर्भीडपणे, तणाव विरहित सामोरे जाईन व चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन माझ्या शाळेचे आई-वडिलांचे, गुरुजनांचे नाव उज्वल करेन, असा संकल्प विद्यार्थ्यांनी घ्यावा.जेणेकरून कॉपीमुक्त अभियानामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्वल होईल.मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार होऊ शकतो हा आशावाद निर्माण होऊन सृजनशील व सुसंस्कृत पिढी तयार होईल,असे प्रतिपादन प्राचार्य राहुल डोंगरे यांनी केले.ते शारदा विद्यालय व कन्या कनिष्ठ महाविद्यालय तुमसर येथे आयोजित विद्यार्थी – पालक – शिक्षक ” विचार मंथन ‘ सभेत अध्यक्ष पदावरून बोलत होते.प्रमुख अतिथी म्हणून पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सौ जयश्री गभने, पालक शिक्षक संघाचे सहसचिव राजेंद्र सिंदपुरे उपस्थित होते.
विद्यार्थी- शिक्षक- पालक यांच्याशी विचार मंथन सभेमध्ये संवाद साधताना प्राचार्य राहुल डोंगरे म्हणाले की राज्यात कॉपीमुक्त अभियानाचे अंमलबजावणी आपल्याला करायची आहे. यासाठी जनजागृती मोहीम, पोलीस बंदोबस्त ,विद्यार्थ्यांची झडती ,महसूल विभागांची बैठकी पथके, भरारी पथके, जिल्हाधिकारी ,पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दौरे होणार आहेत. 100% विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्र प्रवेश यावेळी तपासणी होणार आहे. पूर्णवेळ बैठक पथक नेमण्यात येणार आहेत. परीक्षा पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी केंद्र संचालक , पर्यवेक्षक व परीक्षेची संबंधित व्यक्तीनी या गैरमार्गावर आळा घालण्यासाठी व परीक्षा पारदर्शक होण्यासाठी परीक्षा कक्षातील हालचालींवर लक्ष केंद्रित करणे आमची नैतिक जबाबदारी आहे.पालकांनी सुद्धा आपल्या पाल्यांना सकारात्मक हितोपदेश करावा. प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतःच खुणगाठ बांधावी की,” मी कॉपी करणार नाही.” नक्कीच शंभर टक्के कॉपीमुक्त अभियान यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही.असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.कॉपीमुक्त अभियानाला गालबोट लावणाऱ्या विरुद्ध फौजदारी गुन्हा सुद्धा यावेळी लावण्यात येणार आहे. त्यामुळे चुकीच्या गोष्टीला बळी पडू नये. विद्यार्थी – शिक्षक – पालक यांनी भयमुक्त वातावरणात कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्याचे आवाहन प्राचार्य राहुल डोंगरे यांनी केले.यावेळी पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सौ.जयश्री गभणे आणि सहसचिव राजेंद्र सिंदपुरे , कु.ज्योती बावनकर, दिपक गडपायले, नितुवर्षा मुकुर्णे यांनी विद्यार्थ्यांना ” उद्याच्या चांगल्या आयुष्यासाठी , सनदी अधिकारी, प्रशासकीय अधिकारी,आदर्श विद्यार्थी – नागरिक ” बनण्यासाठी कॉपीमुक्त अभियान यशस्वी करा,असा हितोपदेश केला.संचालन व आभार प्रदर्शन श्रीराम शेंडे यांनी केले. विचार मंथन सभेत विद्यार्थी – पालक -शिक्षक उपस्थित होते.