इंडियन हेडलाइन न्यूज़ एवं संपूर्ण टीम की ओर से विशाल अग्रवालजी गोंदिया को जन्मदिन की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं लोकभिमुक व शिस्तबद्ध प्रशासनाची नवी ओळख; तहसीलदार “उपेश अंबादे” यांच्या कार्यशैलीचा ठसा ब्रेकिंग न्यूज बजाज नगर तुमसर मध्ये नळाला दूषित पाणी जय श्री झूलेलाल श्री पुज्य सिंधी जनरल पंचायत, तुमसर की २०२६-२८ की कार्यकारणी गठीत गौड़ कलाल समाजासह आपल्या सर्व इतर स्नेह समाजबंधूंचा एक अभूतपूर्व सोहळा: बाबाराव देवलवार महिला रुग्णालय तात्काळ सुरू करा अन्यथा शिवसेनेचा तीव्र जनआंदोलनाचा इशारा कर्जमाफीवरून बीडीसीसीचे उपाध्यक्ष ॲक्शन मोडवर अधिपत्याखालील बँकांचा आढावा पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के मार्गदर्शन में फ्रेन्डस ग्रुप द्वारा गोंदिया में भव्य विजेताओं का महासंग्राम क्रिकेट टुर्नामेंट का नगराध्यक्ष सचिन शेडे के हस्ते शुभारंभ छोटा गोंदिया परिसर में माता रमाइबाई आंबेडकर की जयंती उत्सव संपन्न, त्याग की मुर्ति और प्रेरणास्त्रोत है माता रमाबाई आंबेडकर – “प्रफुल गोपालदास अग्रवाल” लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोह आज संघी अवार्ड से सम्मानित होंगे तहसील के टॉपर
PRESS REPORTER FINAL 1 MB
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
ANJALI ONLINE RED ADS.
ANJALI ONLINE BLUE ADS.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

तुमसरमध्ये भीमसंगीताचा जल्लोष! भीमकन्या कडूबाई खरात यांच्या गाण्यांनी रसिक मंत्रमुग्ध 

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ तुमसर प्रतिनिधि 

तुमसर: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात प्रेरणादायी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या विशेष सोहळ्यात सुप्रसिद्ध गायिका भीमकन्या कडूबाई खरात यांनी आपल्या सुमधुर आणि हृदयस्पर्शी गायनाने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. रमाई महिला मंडळ सार्वजनिक उत्सव समिती, आंबेडकर व कुंभारे नगर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम रविवार, ९ फेब्रुवारी रोजी नेहरू पाटांगणावर आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच संपूर्ण वातावरण भीममय झाले होते. “मया भीमानं माय सोन्यानं भरली ओटी,” “भीम माझा गं दिल्लीत भाषण देई,” आणि “होता तो बापाचा बाप, माझा भीमराव आंबेडकर” यांसारख्या हृदयाला भिडणाऱ्या भीमगीतांच्या सुरावटांनी प्रेक्षकांना भारावून टाकले. त्यांच्या गाण्यांवर टाळ्यांचा गजर आणि “जय भीम!” च्या जयघोषात संपूर्ण सभागृह दुमदुमून गेले.

कार्यक्रमात महिला व युवकांची लक्षणीय उपस्थिती होती. रमाईच्या संघर्षाचा गौरव करत, अनेकांनी बाबासाहेब आणि रमाई यांच्या स्मृतींना उजाळा दिला. विशेषतः तरुणांनी भीमगीतांवर ताल धरत उत्स्फूर्त घोषणा देत “बाबासाहेबांचे उपकार आम्ही विसरणार नाही!” असा दृढ संकल्प व्यक्त केला.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रमाई महिला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले. यामध्ये सविता नंदागवळी, सविता बोंबार्डे (अध्यक्षा – रियांशी महिला नागरी सहकारी पतसंस्था, तुमसर), प्रभा खोब्रागडे, पंचशीला शेंडे, त्रिशीला भरनेकर, उषा रामटेके, सुरेखा मेश्राम आणि गीता बोरकर यांनी विशेष मेहनत घेतली. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे संपूर्ण शहराने एक अभूतपूर्व भीममय सोहळा अनुभवला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजू कारेमोरे होते, तर उद्घाटन संकेत मुरकुटे (उद्योजक, नागपूर) यांच्या हस्ते झाले. या वेळी यासीन छवारे, प्रदीप भरणेकर, आयोजक आशिष गजभिये, नवनाथ मेश्राम, अश्विन जगने तसेच पत्रकार आणि रमाई महिला मंडळाच्या मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली. हा संगीतमय सोहळा प्रेरणादायी आणि अविस्मरणीय ठरला, ज्याने संपूर्ण शहर भीममय करून टाकले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
3:09 pm, Feb 17, 2026
temperature icon 33°C
clear sky
18 %
1008 mb
13 Km/h
Wind Gust: 16 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:57 am
Sunset: 6:30 pm

Our Visitor

8 8 3 2 5 1
Total Users : 883251
Total views : 6488727

Our Visitor

8 8 3 2 5 1
Total Users : 883251
Total views : 6488727