![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ तिरोडा प्रतिनिधि
तिरोडा येथील परसवाडा येथे काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला असून, अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. आमदार विजय रहांगडाले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हे कार्यकर्ते भाजपाच्या विकासात्मक धोरणांशी जोडले गेले आहेत.
पक्ष प्रवेश करणाऱ्यांमध्ये मा. सरपंच तथा उपसरपंच श्री मनिरामजी हिंगे, श्री दुलीचंद हिंगे, श्री संजय हिंगे, श्री रविकिरण रहांगडाले, श्री जितेंद्र डहारे, श्री कैलाश साकुरे, श्री राजू बोपचे, श्री रवींद्र मेश्राम, श्री तुषार डोंमळे, श्री अरविंद उईके, श्री गणेश मुळे, श्री रोहित उईके, श्री आनंद साकुरे, श्री नैतलाल सोनी, श्री डी.एस. भगत, तसेच ग्रा.प. सदस्य श्री अनिल ठवकर यांचा समावेश आहे.या सर्व कार्यकर्त्यांचे भाजपात जाहीर स्वागत करण्यात आले. पक्ष प्रवेशाच्या वेळी श्री मुकेश भगत, श्री लक्ष्मण तीतीरमारे आणि श्री भूमेश्वर शेंडे उपस्थित होते. या नेत्यांनी नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत करत भाजपाच्या विचारधारेत काम करण्याचे आवाहन केले.
आमदार विजय रहांगडाले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन या नेत्यांनी भाजपात प्रवेश केला असून, आगामी काळात परसवाडा परिसरात भाजपाची ताकद वाढणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.