![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
इंडियन हेडलाईन न्यूज नेटवर्क/ तुमसर प्रतिनिधी
महाराष्ट्र इंजिनीअर्स असोसिएशन भंडारा जिल्ह्याच्या वतीने आज दिनांक 5 फेब्रुवारी 2025 ला हॉटेल साई प्लाझा भंडारा येथे जिल्हा कार्यकारिणीची बैठक महाराष्ट्र इंजिनिअर असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष इंजि.प्रदिपजी पडोळे यांच्या अध्यक्षते खाली तथा राज्य महासचिव इंजि.हकीम भाई,इंजि. प्रकाशजी गुट्टे
राज्य निवडणूक निरीक्षक,इंजि. सुधीरजी मानकर राज्य उपाध्यक्ष,इंजि.दिलीपजी बाळस्कर,राज्य प्रतिनिधी,इंजि.मामिडवारजी राज्य प्रतिनिधी,इंजि.अमोलभाऊ गण्यारपवार गडचिरोली राज्य प्रतिनिधी तसेच अजयजी सेंगर गोंदिया जिल्हाध्यक्ष,व त्यांचे पदाधिकारी,श्री.विनयजी भाजीपाले नागपूर जिल्हाध्यक्ष व त्यांचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थिती मधे घेण्यात आली या वेळी भंडारा जिल्ह्याची नवीन कार्यकारणी गठित करण्यात आली या वेळी त्यांच्या हस्ते नवीन कार्यकारिणीतील अध्यक्ष,कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष सचिव,यांच्या सह सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्ति पत्र देण्यात आले या वेळी त्यांचे जिल्हा कार्यकारणी तर्फे शॉल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले या प्रसंगी त्यांनी महाराष्ट्र इंजीनियरअसोसिएशन च्या सर्व पदाधिकारी यांना मार्गदर्शन करून सर्व नवनियुक्त पदाधिकार्याना शुभेच्छा दिल्या या वेळी कार्यक्रमाला नवनियुक्त जिल्हाध्यक्ष श्री.आलोकजी पशीने,कार्याध्यक्ष श्री.अमितजी हेडा,नवनियुक्त उपाध्यक्ष, सचिव,पदाधिकारी,व जिल्ह्यातील सर्व इंजीनियर बंधु भगिनी प्रामुख्याने उपस्थित होते