
इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ मोहाडि प्रतिनिधि
दिनांक 27 मार्च 2025 रोज गुरवार ला मोहाड़ी पंचायत समिती येथे आमदार राजूभाऊ कारेमोरे यांच्या अध्यक्षते खाली वार्षिक आमसभा घेण्यात आली असून त्या मंध्ये जिल्हा परिषद क्षेत्र निहाय विविध समस्या चा निराकरण करण्याचा काम आमदार साहेबांनी केले. त्यात तालुक्यात महत्वाचे समस्या मंध्ये 1) पाणी टंचाई भरपूर गावातील लोकांनी गावा मंध्ये सुरु असलेले जलजीवन मिशन अंतर्गत कामे फार संथ गतिने व निष्कृष्ठ दर्जा चे सुरु आहेत संबधित विभागाने याकड़े लक्ष द्यावे असे सांगण्यात आले. काही ठिकाणी हातपंप ची आवश्यक असल्याचे सांगितले.
2) मनरेगा अंतर्गत आपल्या मोहाड़ी तालुक्यात भरपूर विकास कामे झाले आहेत व काही कामे सुरु आहेत. त्यात अकुशल कुशल यांचे अजुन पर्यंत देयक मिळाले नाही आपण शासनाला पाठपूरावा करावा असे संपूर्ण ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांनी आमदार साहेबांना विनंती केली.
3)शेतकरी बांधवाना 12 तास विज मिळण्यात यावे. जेणे करुन उन्हाळी फसल लावण्यात आली असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्पन्न सुद्धा घेता येईल.
4) यशवंतराव चव्हाण वसाहत योजने चे काही पात्र लाभार्थी यांना अजुन पर्यंत पहिला हप्ता मिळाला नाही आपण शासनाला पाठपुरावा करुन निधि मिळवुन देण्यास विनंती केली.
5)संजय गांधी निराधार योजना चे जे लाभार्थी आहेत. त्यांना तहसील कार्यालय येथे ऑनलाइन करण्याकरीता फार मोठ्या प्रमाणात अडचन होत आहेत.तहसीलदार यांना आमदार साहेब यांनी सुचना केले आपण जिल्हा परिषद क्षेत्र निहाय कैंप लावून लाभार्थी लोकांची अडचन दूर करावी.
6) 2022-2023 साली 58 ग्रामपंचायत ला प्रशासन काळात 15 वित्त आयोगा चा निधि अजुन पर्यंत मिळाला नाही आपण शासनाला पाठपुरावा करुन निधि उपलब्ध करुन द्यावा अशी विनंती ग्रामपंचायत मधील सरपंच,ग्रामसेवक यांनी केली.
7)तालुक्यातील ईमारत बांधकाम कामगार मजूर यांच्या 90 दिवस काम केल्याच्या फॉर्म प्राधिकृत अधिकारी म्हणून ग्रामसेवक यांची नेमणुक़ केली आहे. परंतु ग्रामसेवक हे स्वाक्षरी करीत नाही त्यामुळे कामगार हा त्या योजने पासून वंचित राहत आहे.असा प्रश्न सरपंच महोदय व कामगार मजूर यांनी आमदार साहेबांना केले त्यावर शासन GR नुसार ग्रामसेवक यांनी स्वाक्षरी करणे अनिवार्य आहे.त्यावर ग्रामसेवक यांनी सांगितले की महाराष्ट्र मंध्ये आमच्या संघटनेचा विरोध असल्यामुळे आम्ही शासनाला निवेदन द्वारे कळविण्यात आले आहे.त्यावर आमदार साहेब यांनी सर्व ग्रामसेवक यांना आदेश दिले की तुमचा तोड़गा एक हप्ता मंध्ये निकाली काढ़ा अन्यथा शासन आदेशानुसार ईमारत बांधकाम कामगार मजूर यांच्या फॉर्म स्वाक्षरी करा. अशा सूचना आमदार साहेब यांनी ग्रामसेवक यांना देण्यात आले.
8) वरठी येथील गावतील कचरा स्मशान भूमि रोडच्या कड़ेला नेऊन घालत असतात. असा प्रश्न मा. सभापती रितेश वासनिक यांनी उपस्थित केले. त्यामुळे त्याठिकाणी घानी चे साम्राज्य मोठ्या प्रमाणात दिसत आहे.मागील 2 वर्षा पूर्वी आपण भूमि लेख अधिकारी यांच्या कडून कचरा संकुल करीता सोनुली रोड कड़े वरठी हद्दीतील 2 एकर जागे ची मोज माप केली होती. परंतु अजुन पर्यंत त्यांचे काही झाले नाही याकडे ग्रामपंचायत नी विशेष लक्ष्य देण्यात यावे.जेणे करुन कचरा संकुल त्याठिकाणी उभरणी करता येईल.व गावातिल समस्या दूर करता येईल.
9)वरठी येथील जिल्हा परिषद अंतर्गत बाजाराची वसूली केली जाते परंतु त्या ठिकाणी बाजार परिसरातिल विकास कामावर विकास निधि ख़र्च केली जात नाही. आणि त्यामुळे त्या परिसरात अस्वच्छता दिसून येते. खुप मोठ्या प्रमाणात मटन दुकानदार यांनी बाजार परिसरात येण्या- जाण्या च्या रोड ला लागुन अतिक्रमण करुन मटन दुकान सुरु केले आहे. त्यामुळे त्या परिसरात गंदगी निर्माण झाली आहे. व कुत्रा चे प्रमाण वाढले आहे त्या पासून लोकांना धोका निर्माण झालेला आहे. व त्याठिकाणी घाण मोठ्या प्रमाणात दिसून येते.आमदार साहेब आपण या कड़े विशेष लक्ष्य देऊन मटन दुकानदार यांच्या करीता गाड़े काढून द्यावा अशी विनंती मा. सभापती रितेश वासनिक यांनी केली व लगेच आमदार साहेब यांनी सुचना केले की त्या ठिकाणी जागे ची पाहणी करुन इस्टीमेट तैयार करुन घ्यावे.
10) वरठी हे गांव भंडारा जिल्ह्यातील मोहाड़ी तालुक्यातील खुप मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. गावा ची लोकासंख्या दिवसेदिवस वाढत चाललेली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत असल्यामुळे पाहिजे तेवढी विकास निधि मिळत नाही. त्यामुळे नागरिकांना त्याप्रमाणात सुविधाचा अभाव होत आहे.त्यामुळे आपल्या वरठी ग्रामपंचायतीला नगर पंचायत मंध्ये रूपांतर करण्यात यावे. आणि वरठी नगर पंचायत झाली तर आपल्या गावाच्या विकासाला वर्षाला 10 पट च्या वर निधि आपल्या गावाला मिळेल. व लोकांच्या समस्या सुद्धा दूर होतील. सर्व सुविधा त्यांना त्याठिकाणी मिळतील.अशी मागणी मा. सभापती रितेश वासनिक यांना आमसभे मंध्ये केली व सर्वानु मते ठराव घेण्यात आले.
त्यावेळी समस्त पदाधिकारी व विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. व खेळीमेळी च्या वातावरणात आमसभा पार पाडली. व आमदार साहेबांनी सर्वाचे आभार मानून सभा संपन्न केली.





Total Users : 883245
Total views : 6488719
