



इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ तुमसर प्रतिनिधि
तुमसर:- देशाचे आन-बान शान म्हणजे भारतीय सैनिक आहेत. सैनिकामुळे अख्खा भारत देश सुरक्षित आहे. हया माजी सैनिकांनी आपले कुटुंब,मित्र, आप्तेष्ट यांना वेळ न देता भारत देशच माझा कुटुंब समजून आपल्या जीवाचे रान केलं.त्यांचे योगदान अमूल्य आहे.या भारतीय सैनिकांच्या आदर्श विचारांचे आपण अनुकरण केले पाहिजे.ईमानदारी हा गुण आमच्या सैनिका कडून आम्हीं घेतले पाहिजे.सध्या भारताला जास्त काही नाही, फक्त एका सेवेची गरज आहे.ती म्हणजे ईमानदारी.आपण आपल्या देशासाठी जे काही करत आहोत ते इमानदारीने,भ्रष्टाचार न करता केलं पाहिजे.
एक जबाबदार नागरिक म्हणून असणारी कर्तव्ये पार पाडून आपण देशाची सेवा करू शकतो.आपण सदैव भारतीय सैनिकांचे ऋणी आहोतच.त्यामुळे देव्हातरल्या देवा प्रमाणे,सैनिकांचे देखील नित्यस्मरण करायला हवे.देशाचे खरे रक्षक सैनिकच आहेत.त्यांचे आदर्श घ्या. असे प्रतिपादन खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांनी केले.ते दिव्य ज्योती माजी सैनिक बहुउद्देशीय संस्था तुमसर -मोहाडी द्वारा आयोजित वार्षिक सैनिक मेळावा श्यामसुंदर सेलिब्रेशन हॉल तुमसर येथे उद् घाटक म्हणून बोलत होते.विशेष अतिथी सह उदघाटक म्हणून आमदार राजुभाऊ कारेमोरे होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे विदर्भ अध्यक्ष अनिल भुसारी होते तर प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य राहुल डोंगरे हे होते .प्रमुख अतिथी म्हणून राजाराम पटले,गजेंद्र कावळे,कुंडलिक आगाशे माजी सैनिक अधिकारी होते.यावेळी आमदार राजुभाऊ कारेमोरे म्हणाले की,माजी सैनिकांचे कार्य अलौकिक आहे.त्यामुळे आमदार निधीतून अनेक कामे माजी सैनिक बहुउद्देशीय संस्थेकरिता मी करून देणार.या संस्थेकरिता इमारत बांधून देण्यासाठी मी पुढाकार घेणार.फक्त संस्थेने प्रास्ताविक कामे माझ्याकडे आणून द्यावी,मी त्याचा पाठपुरावा करणार असे प्रांजळ मत व्यक्त केले. माणसे जन्माला येतात पण माणुसकी निर्माण करावी लागते. स्वतःसाठी जगणं खूप सोपं आहे,पण देशासाठी प्राणाची आहुती देणारे हे सैनिकच आहे. देशाच्या सुरक्षितते साठी सैनिक रात्रंदिवस जागत असतात,तेव्हाच आपण सुखाची झोप घेतो.अशा खऱ्या देशभक्तांचे आम्हीं आयुष्यभर ऋण फेडू शकत नाही.आजी – माजी सैनिकांच्या कार्याला वंदन करतो.असे हृदयस्पर्शी विचार प्रमुख वक्ते प्राचार्य राहुल डोंगरे यांनी केले.छत्रपती शिवाजी महाराजाच्या शिवचरित्रातून आमच्या सैनिकांनी या देशाला घडवलं.या खऱ्या मावळ्यांनी राष्ट्रहित जपलं.देशवासीयांच्या सुरक्षणासाठी थंड हिमालयात कडाक्याच्या थंडीत सैनिक उभा असतो, तर कधी रणरणत्या वाळवंटात उन्हाचा तडाखा सहन करतो.कुटुंबापासून दूर राहण्याचे दुःख जरी असले तरी मातृभूमीचे रक्षण करण्याचा अभिमान त्यापेक्षा मोठा आहे.माझा देश,माझी शान,आणि त्याचे रक्षण करणे हा माझा धर्म आहे.असा ताकदीनिशी म्हणणारा सैनिकच राष्ट्रनिर्माता असल्याचा हितोपदेश कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल भुसारी यांनी केला.यावेळी लेफ्टनंट चषक पटले यांचे वडील अकरसिंग पटले आणि एन.डी. ए. मध्ये निवड झालेल्या कु.अक्षदा राजेश पडोळे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.स्वर्गीय अर्जुन मरस्कोले हवालदार यांच्या पत्नीचे वनिता मरस्कोले, माणिकराव परबते यांचा स्मृतिचिन्ह व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामकृष्ण तितिरमारे यांनी केले.या संचालन सुधाकर कहालकर यांनी केले.आभार प्रदर्शन शंकरलाल रुंधे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मनोहर तुरकर,अर्जुन हिंगे,सुरेश सेलोकर, नागेश्वर शेंडे आदीसह माजी सैनिकांनी अथक परिश्रम घेतले.