



इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ तुमसर प्रतिनिधि
तुमसर:- मराठी म्हणजे गोडवा,प्रेम,संस्कार,आपुलकी, माय मराठी,साद मराठी,बात मराठी,साथ मराठी,जगण्याला या अर्थ मराठी असं हृदयातून वाटत असेल तर मग घ्या की मराठी माध्यमातून शिक्षण आणि करा मराठी भाषेचे संवर्धन.यातूनच मराठी शाळा शाबूत राहतील.गोर – गरिबांच्या,बहुजनांच्या मुलांना शिक्षण मिळेल.महाराष्ट्रात मराठी शाळेतून अनेक लेखक,साहित्यकार,नाटककार,कवी,कादंबरीकार जन्मास येतील. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांना खऱ्या अर्थाने अभिवादन ठरेल.असे प्रतिपादन प्राचार्य राहुल डोंगरे यांनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने आयोजित महाराष्ट्र राज्य परिवहन आगार मंडळात तुमसर येथे केले.ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्ष स्थानी आगार व्यवस्थापक कन्हैया भोगे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा.संजय लेंगुरे,पत्रकार अनिल कारेमोरे होते. मराठी भाषा ही महाराष्ट्राची आण बाण शान आहे. प्रत्येकानी व्यवहारामध्ये मराठी भाषेतूनच संवाद साधावा.सुप्रभात,आई – बाबा,काका म्हणणारी पिढी दुर्मिळ होत आहे.पाश्चिमात्य संस्कृतीला बळी न पडता घरातील वातावरण मराठीमय करावे.असा हीतोपदेश प्रा.संजय लेंगुरे,पत्रकार अनिल कारेमोरे आणि आगार व्यवस्थापक कन्हैया भोगे यांनी केला.सर्वप्रथम कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन बस स्थानक प्रमुख सौ.रचना मस्करे यांनी केले.सौ.रविता आडे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आकाश बांगळकर,गायत्री कावळे,सविता पचारे, सोनाली फुणे,महेंद्र लांबट,निशिकांत मोटघरे आदींसह चालक – वाहक यांनी परिश्रम घेतले.