



इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ तिरोडा प्रतिनिधि
तिरोडा:- राष्ट्रीय महामार्ग ७५३ चे काम तिरोडापर्यंत पूर्ण झाले असून अदानी पॉवर महा लि.पर्यंत झाले आहे. यामध्ये काचेवानी रेल्वे फाटकवर उड्डाणपूलचे बांधकाम असून सदर पुलाच्या बांधकामाची जागा निश्चित झालेली नसल्याने सदर पुलाचे बांधकाम प्रलंबित आहे यावर काचेवानी रेल्वे चौकीजवळ काही नागरिक वस्ती करून राहत असल्याने सदर पुल बांधकामामध्ये घरे जात असून सदर पुलाची जागा बदलून मागील बाजूने बांधकाम करण्याबाबतची मागणी स्थानिकांनी केली असता तिरोडा गोरेगाव विधानसभ क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी अधीक्षक अभियंता, नरेश बोरकर, रेल्वे विभागाचे विभाग अभियंता अजय पाटील यांचेसोबत मौका चौकशी केली व तातडीने नागरिकांच्या मागणीनुसार पुलाची जागा लवकारात लवकर ठरवून उडानपुलाचे बांधकाम सुरु करण्याचे निर्देश दिले यावेळी ग्रा.प.सरपंच जयश्री गुनेरीया व गावकरी उपस्थित होते.