
इंडियन हेडलाईन न्यूज नेटवर्क/ तुमसर प्रतिनिधी
मुस्लिम बांधवांचा पवित्र सण रमजान ईदनिमित्त आज आपल्या तुमसर शहरातील ईदगाह येथे आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे यांनी सामूहिक नमाज पठणप्रसंगी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी उपस्थित मुस्लिम बांधवांकडून गुलाबांचे रोज देऊन अत्यंत आपुलकीने स्वागत करण्यात आले. आमदार साहेब यांनी सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. वर्षातील सर्वात मोठा सण असलेल्या आजच्या ईदनिमित्त सर्वत्र आनंद व उत्साह ओसंडून वाहताना दिसत होता.





Total Users : 883245
Total views : 6488719
