
इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ तुमसर प्रतिनिधि
तुमसर: सदर शाळेतील मुख्याध्यापक श्री बी पी उपरीकर यांच्या अध्यक्षतेखाली इयत्ता सातवी तील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम घेण्यात आला, दरम्यान सर्व विद्यार्थ्यांनी शाळेप्रती व शिक्षकवृंद प्रती भावना व्यक्त केल्या व ठिकाण बदलले तरी जिव्हाळा कमी होणार नाही असे मनोगत व्यक्त केले, समस्त शालेय कर्मचारींनी मोलाचे मार्गदर्शन केले , सर्वांनी आपापल्या कौशल्यानुसार भविष्यात यशस्वी व्हावे असे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पी डी बामण सर यांनी केले, आभारप्रदर्शन सौ ललिता रेहेकवार मॅडम यांनी केले, सदर कार्यक्रमास सर्व शिक्षकवृंद, कॉन्व्हेन्ट टीचर, स्वयंसेविका, स्वयंपाकी बाई, पालक वर्ग उपस्थित होते.





Total Users : 883234
Total views : 6488705
