
इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ तुमसर प्रतिनिधि
भंडारा पौनी विधानसभेचे कर्तव्यदक्ष आमदार व शिवसेना उपनेते पुर्व विदर्भ संपर्क प्रमुख आदरणीय श्री नरेन्द्रजी भोंडेकर साहेब यांना विधानसभेतील विशेषधीकार समिती येथे अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. त्या करीता तुमसर मोहाळी विधानसभे तर्फे त्यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आले. या प्रसंगी प्रामुख्याने शिवसेना भंडारा जिल्हा प्रमुख अनीलभाऊ गायधने.शिवसेना भंडारा जिल्हा संघटक किशोरजी चौधरी. शिवसेना तालुकाप्रमुख अनिलभाऊ द्रुगकर. युवा सेना भंडारा जिल्हा प्रमुख नितीनभाऊ सेलोकर व अन्य शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते या सभेत आदरणीय नरेंद्रजी भोंडेकर साहेबांनी येणाऱ्या सहकार क्षेत्रातील व स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसेना पदाधिकारी यांना सज्ज रहावे व शिवसेना सदस्य नोंदणी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहावे व आपल्या तर्फे शिवसेना पदाधिकारी यांना भरघोस मदतीचे आश्वासन दिले!





Total Users : 883054
Total views : 6488485
