
इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ आमगांव प्रतिनिधि
महाराष्ट्र वन विकास महामंडळ अंतर्गत चिचगड वनपरिक्षेत्र मगरडोह येथील कक्ष क्रमांक 804 मध्ये निष्कासन कामे करत असताना, मजूर रामकिसन भादुलाल कुंभरे वय 22 यांचा झाडाची फांदी डोक्यावर पडल्यामुळे मृत्यू झाला होता. दरम्यान त्याच्या परिवारात मदत म्हणून आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आ. संजय पुराम यांच्या पाठपुराव्यामुळे एफडीसीएम नागपूरचे व्यवस्थापकीय संचालक संजीव गौड यांनी आर्थिक सहकार्य म्हणून 5 लाखाचे सानुग्रह अनुदान मंजूर केले असून, ते पीडित कुटुंबाला आज दि.02 एप्रिल 2025 रोजी देण्यात आले.
म्हैसुली निवासी रामकिसन कुंभरे हा वन विकास महामंडळाच्या वतीने चिचगड वनपरीक्षेत्र अंतर्गत मगरडोह कक्ष क्रमांक 804 येथे सुरू असलेल्या कामावर रोजंदारी म्हणून कार्यरत होता. दरम्यान झाडांचे निष्कासन करीत असताना त्याच्या डोक्यावर झाडाची फांदी पडल्यामुळे त्याच्या उपचाराकरिता हलविले असता, उपचारादरम्यान त्याच्या मृत्यू झाला. ही घटना 24 सप्टेंबर 2024 ची आहे. क्षेत्राचे आ. संजय पुराम घटनेची दखल घेत, त्याकरिता त्यांच्या परिवारास आर्थिक सहकार्य व्हावे यासाठी पाठपुरावा करीत वन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांनी पाच लाखाचे सानुग्रह अनुदान मंजूर केले मृतकाच्या वारसदाराला दि.02 एप्रिल 2025 रोजी विभागीय व्यवस्थापक भंडारा ए.एस. देशमुख यांच्या हस्ते वनपरिक्षेत्र चिचगड येथील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत आमदार यांच्या निवासस्थानी अनुदानाचे धनादेश देण्यात आले. यावेळी, ए.एस. देशमुख विभागीय व्यवस्थापक वन प्रकल्प भंडारा, टी. एच. हरिणखेडे वनपरिक्षेत्र अधिकारी चिंचगड, डी. एच. पाखमोडे वनरक्षक, डी. एम. गायकवाड, बी.एस. मुंडे, आर. एम. अत्तरकर, बाबूलाल कुंभरे म्हैसुली, सुकचरण कुंभरे तसेच वन विकास महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.





Total Users : 883148
Total views : 6488596
