



इंडियन हेडलाईन न्यूज नेटवर्क/ तुमसर प्रतिनिधी
तुमसर : स्थानिक फादर अग्नेल स्कूल, तुडका ही शिक्षणसंस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या हितासाठी कार्यरत आहे. शैक्षणिक गुणवत्तेसोबतच गरजू पालकांना शक्य तितकी मदत देण्याचा शाळेचा दृष्टिकोन राहिलेला आहे. मात्र, काही पालकांकडून शैक्षणिक फी भरण्याच्या न समस्येमुळे शाळेसमोर आर्थिक अडचणी उभ्या राहिल्या. त्या पार्श्वभूमीवर शाळेने योग्य आणि कायदेशीर पावले उचलली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत शाळेच्या व्यवस्थापनाने दिली.
वेळोवेळी सूचना देऊनही ३० पालकांकडून फी भरण्यात आलेली नव्हती. त्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या. त्यापैकी २३ पालकांनी नोटीसला प्रतिसाद देत फी भरली. मात्र, उर्वरित ७ पालकांनी सहा वेळा नोटीस मिळाल्यानंतरही कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. परिणामी, कायदेशीर सल्ल्यानुसार आणि योग्य प्रक्रियेनंतर त्या विद्यार्थ्यांना ट्रान्सफर सर्टिफिकेट (टीसी) देण्यात आले.
शिक्षणाधिकाऱ्यांना अधिकार नाही
फादर अग्नेल स्कूल ही खाजगी विनाअनुदानित अल्पसंख्याक शिक्षणसंस्था असल्यामुळे शिक्षणाधिकाऱ्यांना अशाप्रकारचा आदेश देण्याचा अधिकार नाही, असा ठाम दावा शाळेने केला आहे. व्यवस्थापनाने त्या आदेशाला फादर अग्नेल स्कूलमधून सात विद्यार्थ्यांना टिसी देण्यात आली होती. त्यांनतर ही घेण्यात पत्रपरिषद आली उत्तर देत कारणे स्पष्ट केली असून, योग्य निर्णय घेण्याची विनंती पुन्हा पत्राद्वारे केली आहे. पत्रकार परीषदेला स्कूलचे व्यवस्थापक फादर बेन, मुख्याधापक फादर प्रकाश मिंज, पीआरओ अस्मिता सावळापुकर, रविकुमार राऊत उपस्थित होते.
शाळेच्या माहितीनुसार, संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना या सर्व घडामोडींची माहिती वेळोवेळी लेखी स्वरूपात दिली गेली होती. सीबीएसई आणि यूआयडी प्रणालीलाही याबाबत अवगत करण्यात आले होते. तथापि, टीसी जारी झाल्यानंतर एका पालकाने चुकीची माहिती देत शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यावर आधारित आदेश देत विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवेश देण्याचे निर्देश दिले गेले. मात्र, हे आदेश शाळेच्या मते घटनाबाह्य व बेकायदेशीर आहेत.