



इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ तुमसर प्रतिनिधि
धोप: श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ सप्ताह निमित्त आरोग्य शिबीर,रक्तदान शिबिर ,नेत्र तपासणी, औषधी वितरण आयोजित करण्यात आले होते .या आरोग्य शिबीर चे उद्घाटक मा.श्री.रविशंकर निमकर धान्य व्यापारी यांच्या हस्ते करण्यात आले,तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री.ओमप्रकाश सपाटे.शाम शेंडे ,उपसरपंच ओमकार मोहतुरे माजी उपसरपंच गणेशजी सोमनाथे धान्य व्यापारी.संदिपजी बुड्डेकर.राजेश सपाटे.मंगलदिप मते सुधिर सपाटे. श्रीकांत निमकर महेश गिरेपुजे. हेमंत सपाटे.रुपेश सपाटे.गजानन शेंडे.धनराज बिरमगडे. महेंद्र मेश्राम विजय अवचट.तसेच शिवाजीराव ग्रामीण बहुउद्देशीय संस्था एकलारी चे अध्यक्ष सुनिल भोयर व सचिव अनिल आमटे हे सर्व उपस्थित राहून ,सहकार्य केले. श्रीमद् भागवत कथा सत्ताह चे अध्यक्ष श्री.रविंद्र जी सपाटे.सुरेश शेंडे माजी सैनिक.व समस्त धोप ग्रामवासी,मित्रमंडळ उपस्थित होते.