
इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ तुमसर प्रतिनिधि
तुमसर: तालुक्यातील खरबी येथे तुमसर-भंडारा मार्गावरील गावतलावात १ मे ते ३ मे पर्यंत आदर्श बैलांचा ईनामी शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शंकरपाटात प्रथम बक्षीस एकतीस हजार रुपये आमदार राजु कारेमोरे व जि.प.सदस्य देवा ईलमे यांच्या कडून देण्यात येणार आहे. व्दितीय बक्षिस पंचविस हजार रुपये जि.प.सदस्य दिलीप सार्वे यांच्या कडून तर तृतीय बक्षीस वीस हजार रुपये
माजी सरपंच तथा ग्रा.प.सदस्य आनंद सिंगनजुडे यांच्या कडून तर चतुर्थ बक्षीस पंधरा हजार रुपये उद्योगपती तथा माजी सरपंच विनोद तुमसरे यांच्या कडून तर पाचवे बक्षिस तेरा हजार रुपये प.स.सदस्य लक्ष्मीकांत सेलोकर यांच्या कडुन देण्यात येणार आहे. तर असे तीस क्रमांकापर्यत बक्षिस देण्यात येणार आहे.तर पराजित बैलजोडीला सुध्दा बक्षिस देण्यात येणार आहे.सदर तिन दिवसीय शंकर पटात जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी उपस्थित राहुन आपल्या बैलजोड्या सहभागी कराव्यात असे आवाहन शंकर पटाच्या आयोजकांकडून करण्यात आले आहे.





Total Users : 883240
Total views : 6488713
