
इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ तुमसर प्रतिनिधि
तुमसर :शेतातील ४० कोंबड्या मारल्याच्या रागातून एका व्यक्तीने पाळीव श्वानाला एअरगनने गोळ्या झाडून ठार केल्याचा प्रकार तुमसर तालुक्यातील गोबरवाही पोलीस ठाण्याच्या हद्दीत चिखला गावात घडला. या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. गोबरवाहीचे ठाणेदार शरद शेवाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ जून रोजी रात्री चिखला माईन्स येथील दुर्गा चौकात एका श्वानावर एअरगनने हल्ला करून त्याला ठार मारण्यात आले. याप्रकरणी गोबरवाही पोलिसांनी एका तरुणाच्या तक्रारीवरून आरोपी आरिफ सलाम शेख (४५, रा. चिखला) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
चिखला गावातील दुर्गा चौकात धार्मिक कार्यक्रम संपल्यानंतर राहुल आणि त्याचे मित्र घरी परतत असताना आरिफ हा राहुलच्या श्वानावर एअरगनने हल्ला करताना दिसला. राहुलने त्याला कारण विचारले असता त्याने सांगितले की, श्वानाने त्याच्या शेतातल्या ४० कोंबड्या मारल्या. त्यामुळे त्याने श्वानाला मारले. या घटनेबाबत राहुलने २३ जून रोजी गोबरवाही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. होती त्यावर पोलिसांनी तत्काळ कारवाई केली.
मुक्या प्राण्यांवर निर्दय पणे गोळ्या झाडून ठार मारणे हे कायद्याने गुन्हा आहे.याविषयी नागरिकांनी भान ठेवावे. यात आरोपींचे नुकसान झाले असेल तर त्याने कायदेशिर मार्गाने नुकसानभरपाई साठी मागणी करायला हवी होती.श्वानाचा जीव घेणे आयोग्य आहे.
अनिल कारेमोरे, अध्यक्ष, सेव डाॅग फाउंडेशन तुमसर.





Total Users : 883190
Total views : 6488658
