इंडियन हेडलाइन न्यूज़ एवं संपूर्ण टीम की ओर से विशाल अग्रवालजी गोंदिया को जन्मदिन की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं लोकभिमुक व शिस्तबद्ध प्रशासनाची नवी ओळख; तहसीलदार “उपेश अंबादे” यांच्या कार्यशैलीचा ठसा ब्रेकिंग न्यूज बजाज नगर तुमसर मध्ये नळाला दूषित पाणी जय श्री झूलेलाल श्री पुज्य सिंधी जनरल पंचायत, तुमसर की २०२६-२८ की कार्यकारणी गठीत गौड़ कलाल समाजासह आपल्या सर्व इतर स्नेह समाजबंधूंचा एक अभूतपूर्व सोहळा: बाबाराव देवलवार महिला रुग्णालय तात्काळ सुरू करा अन्यथा शिवसेनेचा तीव्र जनआंदोलनाचा इशारा कर्जमाफीवरून बीडीसीसीचे उपाध्यक्ष ॲक्शन मोडवर अधिपत्याखालील बँकांचा आढावा पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के मार्गदर्शन में फ्रेन्डस ग्रुप द्वारा गोंदिया में भव्य विजेताओं का महासंग्राम क्रिकेट टुर्नामेंट का नगराध्यक्ष सचिन शेडे के हस्ते शुभारंभ छोटा गोंदिया परिसर में माता रमाइबाई आंबेडकर की जयंती उत्सव संपन्न, त्याग की मुर्ति और प्रेरणास्त्रोत है माता रमाबाई आंबेडकर – “प्रफुल गोपालदास अग्रवाल” लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोह आज संघी अवार्ड से सम्मानित होंगे तहसील के टॉपर
PRESS REPORTER FINAL 1 MB
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
ANJALI ONLINE RED ADS.
ANJALI ONLINE BLUE ADS.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान, तुमसर च्या वतीने आयोजित बाल संस्कार शिबीर व शिवकालीन मैदानी खेळांचे मोफत प्रशिक्षण

शिवकालीन मैदानी व मर्दानी खेळांची आवश्यकता

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ तुमसर प्रतिनिधि 

भारतातील शिवकालीन युद्ध कला सगळीकडे प्रसिद्ध आहे. स्वराज्य स्थापनेत छत्रपती शिवाजी महाराजांना महत्त्वाचे योगदान देणाऱ्या युद्ध कलेला मर्दानी खेळ म्हणून ओळखले जाते. भारताला युद्धकलेची मोठी परंपरा लाभली आहे. ही परंपरा टिकवण्यासाठी अनेक राज्यांत विविध प्रयत्न सुरू आहेत. शिवकालीन युद्धकला ही माणसाला परिपूर्ण बनविणारी कला आहे. यात दांडपट्टा, तलवारबाजी, लाठीकाठी अशा मर्दानी खेळाचा समावेश हाेताे.मैदानी खेळ म्हणजे असे खेळ जे मैदानावर खेळले जातात. यामधे संपूर्ण शरीराची हालचाल होते, शरीराचा व्यायाम होतो, व शरीर तंदुरुस्त राहते. मैदानी खेळ हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काही खेळ हे एकट्याने खेळायचे असतात तर काही अनेक खेळाडू एकत्र येऊन खेळले जातात.

लाठी-काठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत असलेला हा एक प्राचीन मर्दानी खेळ. स्वसंरक्षण व शत्रूवर हल्ला करणे यातून लाठी फिरवण्याच्या कल्पनेचा उगम झाला. प्राचीन काळात बचाव व हल्ला यांसाठी सुरूवातीला झाडाच्या फांदीच्या वापर होत हाेता, दोन प्रतिस्पर्धी एकमेकाच्या शरीराला लाठीचा स्पर्श करून गुण मिळवतात. लाठी अंगाभोवती न थांबू देता गरगर फिरवून एकातून एक अशी वर्तुळे निर्माण करण्यात खरे कौशल्य असते.दांडपट्टा हे मध्ययुगीन भारतीय उपखंडातले तलवारीसारखे पात्याचे शस्त्र आहे. दांडपट्टा ही एक प्राणघातक तलवार होती, ज्यावर मराठा योद्धांचे नियंत्रण होते असे म्हटले जाते. मराठ्यांच्या प्रमुख शस्त्रांमध्येही त्याचा समावेश होता. अनुभवी योद्धे या घातक तलवारीवर नियंत्रण ठेवू शकतात. 

“कुठे तुला लढायला जायचे, गप्प बस घरात’ पालकांचे हे वाक्य मुलांच्या सर्वांगीण विकासाला बाधा आणते. मात्र, पालकांनो लढायला जायचे नसले तरी स्व-रक्षणासाठी तरी मुला-मुलींना मैदानावर पाठवा. त्यांना मर्दानी खेळ खेळूद्या, शस्त्रास्त्रांची ओळख होवू द्या आपला इतिहास आत्मसात करूद्या, तरच आपली संस्कृती आणि संस्कार टिकतील. त्यासाठी “शिवकालीन कला, शस्त्रास्त्र, गडकिल्ले’ मोहीम हाती घ्यावी लागेल. आधुनिक तंत्रज्ञानात आपण पुरते गुरफटले गेल्याने मैदानी खेळ तर संपलेच. “खेळ उरला तो टीव्ही आणि मोबाइलच्या स्क्रीनवर’. त्यामुळे वेळीच मुलांना मैदानावर पाठविण्यासाठी पालकांनी लाड बाजूला ठेवून किमान स्व-रक्षणाचे धडे मिळतील, असा युवक तरी तयार होऊ दिला पाहिजे. त्यामध्ये मुले-मुली दोघांनाही संधी मिळावी, त्यासाठी शिवकालीन खेळ, शस्त्रास्त्र आणि गडकिल्ले यांची माहिती व प्रशिक्षण देणे अंत्यत आवश्यक असून, काळाजी गरज बनली आहे. “मन, मेंदू आणि मनगट यांच्यामध्ये साहस निर्माण करण्याचे असेल तर मुला-मुलींनी मैदानात उतरलेच पाहिजे. शिवकालीन शस्त्रास्त्र खेळाचे प्रशिक्षण आपल्या मुलांना नेहमीच स्व-रक्षणासाठी महत्वपूर्ण आहेत. त्यातून आपली संस्कृती आणि संस्कार टिकून राहतील. नगर परिषद बांगळकर शाळेच्या मैदानात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रशिक्षणाला सुरवात झाली यावेळी छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान तुमसर चे संस्थापक अध्यक्ष इंजि. नितीन धांडे, उपाध्यक्ष विक्की साठवणे, सचिव प्रा. अमोल उमरकर, कोषाध्यक्ष इंजि. प्रतिक बुधे, संपर्क प्रमुख कोमल वानखेडे, सदस्य सोनू दुपारे, नितीन सार्वे, हौसीलाल ठाकरे, प्रशांत वासनिक, युवनेश धांडे, ज्योती हेडाउ प्रशिक्षक उपासराव सोनवाणे, अक्षय सोनवाणे व पालक उपस्थित होते. 

दिनांक 1 जून ते 6 जून 2025 पर्यंत. वेळ : सकाळी 6.00 ते सायं. 8.00

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
8:40 am, Feb 17, 2026
temperature icon 24°C
clear sky
35 %
1014 mb
12 Km/h
Wind Gust: 18 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:57 am
Sunset: 6:30 pm

Our Visitor

8 8 3 2 2 8
Total Users : 883228
Total views : 6488698

Our Visitor

8 8 3 2 2 8
Total Users : 883228
Total views : 6488698