BREAKING NEWS
गोंदिया नगर परिषद में राकेश ठाकुर बने कॉग्रेस के पक्ष नेता नगराध्यक्ष सचिन शेंडे एवं सभी पार्षदों की उपस्थिती में सर्वसम्मती से हुआ चयन पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल की अध्यक्षता में नवनिर्वाचित नगराध्यक्ष सचिन शेडे एवंम सभी १६ पार्षदों का सत्कार व जनआभार सभा सफलता पूर्वक संपन्न श्री शिर्डी धाम महाराष्ट्र में हुए राष्ट्रीय पंचम अधिवेशन में, भारतीय कलचूरी जायसवाल संवर्गीय महासभा के राष्ट्रीय अध्यक्ष बनाये गये वीरेन्द्र कुमार राय एड० नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प बफर क्षेत्रात प्रशासकीय सुधारणा जाहीर.”आ. विजय रहांगडाले यांच्या पुढाकाराने वन्यजीव संघर्ष हाताळण्यासाठी मिळणारे जास्तीचे अधिकारी कर्मचारी!” अन्वित मने याची आंतरराष्ट्रीय स्तरावरील कला स्पर्धेसाठी निवड. जनतेने कामालायक न ठेवल्याने विरोधकांकडून टिका “आमदार डॉ. परिणय फुके यांचा टोला : विरोधकांची स्थिती गोंळलेली”
गोंदिया नगर परिषद में राकेश ठाकुर बने कॉग्रेस के पक्ष नेता नगराध्यक्ष सचिन शेंडे एवं सभी पार्षदों की उपस्थिती में सर्वसम्मती से हुआ चयन पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल की अध्यक्षता में नवनिर्वाचित नगराध्यक्ष सचिन शेडे एवंम सभी १६ पार्षदों का सत्कार व जनआभार सभा सफलता पूर्वक संपन्न श्री शिर्डी धाम महाराष्ट्र में हुए राष्ट्रीय पंचम अधिवेशन में, भारतीय कलचूरी जायसवाल संवर्गीय महासभा के राष्ट्रीय अध्यक्ष बनाये गये वीरेन्द्र कुमार राय एड० नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प बफर क्षेत्रात प्रशासकीय सुधारणा जाहीर.”आ. विजय रहांगडाले यांच्या पुढाकाराने वन्यजीव संघर्ष हाताळण्यासाठी मिळणारे जास्तीचे अधिकारी कर्मचारी!” अन्वित मने याची आंतरराष्ट्रीय स्तरावरील कला स्पर्धेसाठी निवड. जनतेने कामालायक न ठेवल्याने विरोधकांकडून टिका “आमदार डॉ. परिणय फुके यांचा टोला : विरोधकांची स्थिती गोंळलेली” भंडारा शहरात पाण्यासाठी वणवण… काही ठिकाणी नासाडी; वाढीव पाणीपुरवठा योजना रखडल्याने नागरिक त्रस्त..”आमदार डॉ. परिणय फुके यांनी पाणीपुरवठ्याच्या अनियमिततेकडे वेधले लक्ष” निजानन्द जायसवाल एवं सुजाता जायसवाल की रिंग-सेरेमनी ओबीसींच्या योजनांत वित्त विभागाचे अडथळे “आमदार डॉ. परिणय फुके यांची संपूर्ण निधी उपलब्ध करून देण्याची मागणी” हैहयवंशी कलचुरी समाज की आन,बान,शान उत्कृष्ट वरिष्ठ समाजसेवी निःस्वार्थ भाव के महान दानदाता आदरणीय शिवचरण हांड़ा निवासी जयपुर राजस्थान (पूर्व इनकम टैक्स ऑफिसर)
PRESS REPORTER FINAL 1 MB
CHIMANLAL SONY TUMSAR ADD
JAYANTI BHAI JWELLERS TUMSAR
ANJALI ONLINE RED ADS.
ANJALI ONLINE BLUE ADS.
Screenshot_20251108_154754
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

जपानसारख्या विकासासाठी होणार प्रयत्न:- डॉ. परिणय फुके

परदेशात केलेला अभ्यास राज्याच्या मातीत उतरणार:- देवेंद्र फडणविस

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ भंडारा प्रतिनिधि 

माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी जपान दौऱ्यातील तंत्रज्ञान, शिस्त आणि बुलेट ट्रेनचा अनुभव मुख्यमंत्र्यांशी शेअर केला.  आपल्या अभ्यास दौऱ्यातून माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी जपानमध्ये टिपलेले बारकावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शेअर केले. दोन नेत्यांच्या या संवादातून राज्याच्या मातीत जपानसारखा विकास होण्याची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे. जपान दौऱ्यात डॉ. फुके यांनी बारकाईनं अभ्यास केला. जपानचं तंत्रज्ञान जाणून घेतलं. विकासाची प्रक्रिया माहिती करून घेतली. यातील प्रत्येक बाबीवर त्यांनी देवाभाऊंसोबत चर्चा केली. 

जपान दौऱ्यात डॉ. फुके यांनी अनेक स्थानिक अधिकाऱ्यांशी, लोकप्रतिनिधींशी चर्चा केली. महाराष्ट्रासाठी त्यातून काय घेता येईल, यावर विचारमंथन केलं. जपानमधूनन परत येताच क्षणाचाही विलंब न करता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांच्यासमोर आपली निरीक्षणं मांडली. डॉ. फुके यांनी जपानमध्ये तंत्रज्ञानाची परिपूर्ण माहिती घेतली. जपानी संस्कृती आणि जीवनशैलीचा देखील अभ्यास केला. शिंकान्सेन बुलेट ट्रेनचा प्रवास, जपानच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळांची कार्यपद्धती, तसेच रोबोटिक्स व इलेक्ट्रॉनिक्ससारख्या क्षेत्रातील नवकल्पना याचा त्यांनी अनुभव घेतला. 

महाराष्ट्रात तंत्रज्ञान विकास

महाराष्ट्रासाठी त्यांनी या तंत्रज्ञानाचा आणि शिस्तीचा उपयोग कसा करता येईल, याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत विचारमंथन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेत त्यांनी जपानमधील तंत्रज्ञान आणि विकास महाराष्ट्रात कसा आणता येईल, यावर खोलवर विचारविनिमय करण्यात आला. विदर्भाच्या विकासासाठी देवेंद्र फडणवीस नेहमीच आग्रही असतात. नागपूरसह संपूर्ण विदर्भाच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसाठी ते करीत अससेले काम सर्वश्रूत आहे. आता त्यांना डॉ. फुके यांचीही साथ मिळणार आहे. 

फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झालेत तेव्हा त्यांनी ‘बडे मियाँ, छोटे मियाँ’ प्रमाणे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत नागपूरचा कायापालट केला. मेट्रो प्रकल्प झपाट्यानं साकारला. रस्त्यांचा नवा आराखडा राबविला गेला. उड्डाणपुलांची मालिका तयार झाली. आता या विकासाच्या घोडदौडीमध्ये डॉ. परिणय फुके देखील सामील झाल्याचं दिसत आहे.

डॉ. फुके म्हणतात की, जपानची शिंकान्सेन बुलेट ट्रेन ही फक्त तंत्रज्ञान नव्हे, तर एक पूर्ण जीवनशैलीचा अनुभव आहे. 513 किलोमीटरचा प्रवास 2 तास 15 मिनिटांत पूर्ण झाला. हा प्रवास गतीमान होता. आरामदायक आसन, व्यवस्था होती. वेळेचे काटेकोर पालन होत होते. जपानमध्ये शिस्त आणि सुव्यवस्था हाच यशाचा मुख्य पाया आहे. भारतात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प सुरू आहे. जपानी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हा प्रकल्प भारताच्या रेल्वे व्यवस्थेत क्रांतिकारक बदल घडवून आणणार आहे. डॉ. फुके यांच्या मते, या प्रकल्पामुळे देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला नवा वेग मिळणार आहे. महाराष्ट्रासाठीही या तंत्रज्ञानाचा समर्पक वापर केल्यास महानगरांच्या विकासाला गती मिळेल.

स्मार्ट सिटीचा आदर्श

डॉ. फुके यांच्या या पुढाकारानं आता नागपुरातून सुरू झालेली विकासाची गंगा अधिक वेगानं भंडारा, गोंदियापर्यंत पोहोचण्याची चिन्हे आहेत. जपानमधील तंत्रज्ञानाचा महाराष्ट्रासह आपल्या भागात कसा वापर करता येईल, यासाठी डॉ. फुके भविष्यात नक्कीच प्रयत्न करताना दिसण्याचे हे संकेत आहेत. डॉ. फुके यांचे या दिशेने नवे प्रयोग लवकरच दिसतील असे यावरून वाटते. नागपूरमध्ये मेट्रो, उड्डाणपूल, आणि रस्त्यांच्या नव्या स्वरूपामुळे शहराची ओळखच बदलली आहे. आता या विकास प्रक्रियेत डॉ. फुके यांनीही सक्रिय भूमिका घेतल्याचं दिसत आहे. जपानच्या तंत्रज्ञानाशी सुसंगत अशा अॅक्शन प्लॅनवर फडणवीस आणि फुके यांनी एकमत व्यक्त केलं. यावर लवकरच कामही सुरू होऊ शकते. भविष्यात काही योजना आकारास येऊ शकतात. 

डॉ. फुके यांनी जपानमधील रोबोटिक्स, एआय-आधारित सुरक्षा प्रणाली आणि स्मार्ट विमानतळ यांसारख्या नवकल्पनांचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, जपानमधील हे तंत्रज्ञान भारतीय स्मार्ट सिटी योजना, राष्ट्रीय महामार्ग आणि मेट्रो प्रकल्पांसाठी आदर्श ठरू शकते. जपानच्या शिस्तबद्धतेची आणि तंत्रज्ञानाची संगम भारताच्या विकासासाठी नवीन आदर्श निर्माण करेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प बफर क्षेत्रात प्रशासकीय सुधारणा जाहीर.”आ. विजय रहांगडाले यांच्या पुढाकाराने वन्यजीव संघर्ष हाताळण्यासाठी मिळणारे जास्तीचे अधिकारी कर्मचारी!”

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
7:29 am, Jan 1, 2026
temperature icon 15°C
clear sky
72 %
1015 mb
9 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 9%
Visibility: 10 km
Sunrise: 7:03 am
Sunset: 6:02 pm

Our Visitor

8 8 0 4 6 7
Total Users : 880467
Total views : 6484722

नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प बफर क्षेत्रात प्रशासकीय सुधारणा जाहीर.”आ. विजय रहांगडाले यांच्या पुढाकाराने वन्यजीव संघर्ष हाताळण्यासाठी मिळणारे जास्तीचे अधिकारी कर्मचारी!”

Our Visitor

8 8 0 4 6 7
Total Users : 880467
Total views : 6484722
error: Content is protected !!