
इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ तुमसर प्रतिनिधि
तुमसर : शैक्षणीक सत्र 2025 – 26 च्या पहिल्या दिवसी जि. प.उच्च प्राथ शाळा लोहारा येथिल इयत्ता पहिल्या वर्गात दाखल झालेल्या मुलांचा नाविन्यपूर्ण पद्धतीनें मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले. सुरुवातीस क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले आणि ज्ञानजोती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर एकेकाळी शेतकऱ्यांचे महत्वाचे वाहनं असलेल्या बैलगाडीला सजवून त्यात पहिल्या वर्गात दाखल झालेल्या नवागत विद्यार्थ्यांना बसवून संपूर्ण गावातून लेझिम नृत्याच्या माध्यमातुन मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत पालक आणि गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक उस्फूर्तपणे सहभागी झाले होते. त्यानंतर पहिल्या वर्गात दाखल झालेल्या विद्यार्थ्यांच्या पाऊंलांचे मान्यवरांच्या हस्ते ठसे घेण्यात येवून त्यांना गणवेश, पुस्तकं, बुट – मोजे भेट देवून त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच इयत्ता पहिली ते सातव्या वर्गात बाहेरील शाळेतून नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे सुद्धा स्वागत कराण्यात आले. प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच सविताताई ठाकरे, विशेष प्रमुख पाहुणे म्हणून पं. स. सदस्य सलोनीताई भोंडे, प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मंगेश वरकडे, उपसरपंच आशिष ब्रम्हानोटे, उपाध्यक्ष भागवत दुपारे, केंद्रप्रमुख ओम सावतवान सर, सामजिक कार्यकर्ते अरविंद ठाकरे, तंटा मुक्ती समिती अध्यक्ष सुरेंद्र भागडकर, ग्राम अधिकारी पटलेजी, केन्द्र विशेष शिक्षक नरेंद्र वाहने सर, सुरेंद्र भगत, रामकिशन शहरे, आशा भागडकर, मंजुषा दुपारे, कमला वरकडे, प्रविण ठोंगे, साधना घोडीचोर, रेखा लेदे, तसेच शाळेचे मुख्याध्यापक धनराज पराते सर यांची उपस्थिती होती. सलोनी ताई भोंडे यांनी शाळेत राबविण्यात येत असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल कौतुक केले. अरविंद ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबद्दल कौतुक करुन शाळेस सहकार्य करण्याचे आश्वास दिले. संपुर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल भुसारी यांनी तर आभार राजपाल गजभिये यांनी केले.
याप्रसंगी अरविंजी ठाकरे आणि सवितातई ठाकरे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेस महामानवाच्या दहा प्रतिमा भेट दिल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अरविंद कुंमरे सर, निशांत पारधी सर, स्वयंसेवक सुमित माकडे, आणि रजिया घोडिचोर मॅडम यांनी प्रयत्न केले.





Total Users : 882900
Total views : 6488270
