
इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ तुमसर प्रतिनिधि/ अनिल कारेमोरे
तुमसर : आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालय, तुमसर येथे शनिवारी योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. “आरोग्य हीच खरी संपत्ती” या भावनेतून रुग्णालयाच्या वतीने संपुर्ण वैद्यकीय कर्मचाऱ्यांना एकत्रित आणत शारीरिक, मानसिक आरोग्याचा संदेश देण्यात आला. या विशेष कार्यक्रमात योग प्रशिक्षिका संगीता ठाकरे यांनी उपस्थितांना विविध योगासनांचे प्रात्यक्षिक करून दाखवत योगाचे शास्त्रीय महत्त्व पटवून दिले. त्यांनी प्राणायाम, ताडासन, भुजंगासन, त्रिकोणासन, वज्रासन आदी योगासनांचे सादरीकरण करत नियमित योगाभ्यासामुळे होणारे फायदे सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय अधीक्षक डॉ. नितीन मिसूरकर होते. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन बाळबुधे, डॉ. प्रसाद कारेमोरे, डॉ. अनुप कोरडे यांच्यासह रुग्णालयातील सर्व कर्मचारी, परिचारिका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. योग दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात कर्मचाऱ्यांमध्ये नवीन उर्जा, उत्साह निर्माण झाला. आरोग्यदायी जीवनशैलीकडे वाटचाल करताना योगाचा अंगीकार करणे ही काळाची गरज असल्याचे मत उपस्थितांनी यावेळी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आयोजन उपजिल्हा रुग्णालय प्रशासन व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने करण्यात आले. योगदिनी रुग्णालयातील परिसर एक वेगळी सकारात्मक ऊर्जा अनुभवत होता, हे विशेष!





Total Users : 883187
Total views : 6488655
