
तुमसर: राज्य परिवहन विभागाच्या वतीने एसटीने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य विनासवलतधारी प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता १५१ कि.मी. किंवा त्याहून अधिक अंतराच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण केल्यास प्रवाशांना मुळ तिकीट भाड्यात तब्बल १५% सूट दिली जाणार आहे. ही योजना वर्षभर लागू असणार असून, केवळ उन्हाळी व दिवाळी गर्दीच्या कालावधीत याला अपवाद राहील. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांनी आपली तिकिटे आगाऊ आरक्षित करणे आवश्यक आहे.
सहायक वाहतूक अधीक्षक सौ. रचना मस्करे आणि आगार प्रमुख कन्हैया भोगे यांनी प्रवाशांना या योजनेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. ही योजना राज्य परिवहन विभागाच्या प्रवासी केंद्रित धोरणाचे प्रत्यक्ष उदाहरण असून, त्यामुळे एसटी प्रवास अधिक किफायतशीर आणि सुलभ होणार आहे.





Total Users : 883092
Total views : 6488527
