
करडी/पालोरा: करडी सब डिव्हीजन कार्यालय अंतर्गत येणाऱ्या सर्व फीटरवरील कृषी पंपाला 12 तास विज देण्यासंबंधी पालोरा जांभोरा परीसरातील शेतकऱ्यांनी 2 जुलै पर्यंत 12 तास विज पुरवठा सुरू केला नाहीतर करडी विज वितरण विभागाच्या कार्यालयावर शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा काढण्यात येईल यासंबंधी विज वितरण विभागला निवेदन देण्यात आले होते.परंतु शेतकऱ्यांची मागणी मंजूर केली नसल्यामुळे 2 जुलै 2025 रोज बुधवार ला करडी विज विभागाच्या समोर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी 10 वाजता हजर राहण्याची विनंती शेतकर कडून केली जात आहे.
सविस्तर असे की 12 फरवरी 2025 ला करडी येथील विज वितरण विभाग समोर शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते त्यावेळी विज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना लेखी आश्वासन देण्यात आले होते की 12 तास नियमित कृषी पंपा करीता विज देण्यात येईल असे लेखी लिहून देवून शेतकऱ्यांची फसवणूक करून 12 तास ऐवजी 8 तास विज पुरवठा दिला जात आहे . त्यामुळे पालोरा, जांभोरा, करडी ,निलज परीसरातील शेतकऱ्यांनी करडी विज वितरण कार्यालया समोर आक्रोश मोर्चा काढण्याचा पुढाकार घेवून उद्या दि 2 जुलै 2025 रोजी बुधवार ला सकाळी 10 वाजता यादोराव मुंगमोडे, उमेश तुमसरे ,धामदेव वनवे, यशवंत गायधने, अशोक शेंडे, रूपेश ठवकर, भाऊराव बुधे, ताराचंद समरीत यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे तरी परीसरातील शेतकऱ्यांनी हजर राहण्याची विनंती .जो पर्यंत शेतकऱ्यांना १२ तास कृषी विज पुरवठा देणार नाही तो पर्यंत कार्यालय समोर आंदोलन करु असे आणि कोणत्याही प्रकारची उचित घटना घडली तर याला जबाबदार विज वितरण विभाग राहील असे लेखी निवेदनातून म्हटले आहे.आणी शेतकरी आपल्या हक्कासाठी मागेपुढे पाहणार नाही असा थट्ट पुढाकार घेऊन उद्या ९ वाजेपासून पाचशे च्या जवळपास शेतकरी पायदळ पदयात्रा काढून करडी विज वितरण विभाग कार्यालय मध्ये धडकणार आहेत.





Total Users : 883054
Total views : 6488485
