
तुमसर: गेल्या अनेक दिवसांपासून तुमसर शहरात तसेच ग्रामीण भागात चोरीच्या घटना हे वाढतानाचे चित्र आज घडीला दिसून येत आहे. पोलीस प्रशासनाच्या वचक गुन्हेगावरावर नाही काय असा प्रश्न आता सर्व सामान्य नागरिकांना पडू लागला. आज दि. 09:7:2025 ला मध्य रात्री मौजा डोंगरला येथे चोरट्यानी पुन्हा एक दुकान फोडून टायर चोरून नेले ज्याची साधारणत किंमत 40000 रुपये असल्याचे सांगितले जात आहे सदर घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून नागरिक असुरक्षित असल्याचे पहायला मिळत आहे शहर व ग्रामीण भागाच्या बिहार होतो कि काय अशी स्थिती आता नागरिकांना सतावते आहे. तुमसर चे ठाणेदार अकार्यक्षम असल्याचे नागरिकांकडून सातत्याने बोलले जात असून त्याच्या कार्यकाल मध्ये चोरीच्या घटनेत वाढच होत असल्याचे बोलले जात आहे. ठाणेदार विषयी जनतेत प्रचंड नाराजी असून त्यांना तत्काळ स्थलानंतर करून एक कर्तव्य दक्ष ठाणेदार द्यावे अशी सुद्धा मागणी नागरिकांनाकडून केली जात आहे. अशा वाढत्या चोरीचं प्रमाण थांबलं पाहिजे यां करिता लोकप्रतिनिधी सुद्धा आता लक्ष देऊन शहरात शांतता कशी प्रस्थापित होईल याकडे लक्ष दिला पाहिजे.





Total Users : 883187
Total views : 6488655
