
तुमसर: मृत आत्मा दुःखी आणि कर्मचारी सुखी -तुमसर शासकीय दवाखान्यात मृतदेहाच्या आशीर्वादाने कर्मचाऱ्यांची भरपूर कमाई- मात्र अधिकारी झोपेत तुमसर -मोहाडी तालुक्यातील आंबागड गावातील संकेत गणपत कोकुडे (२२ )या युवकांनी घरगुती वादावरून गावालगत झाडाला गळफास लावून दिनांक 17/ 7/2025 ला आत्महत्या केली .ही बाब दुपारी एक वाजता उघडीस आली. आंधळगाव पोलीस स्टेशनच्या हददीत गाव येत असल्याने ताबडतोब कारवाईला सुरुवात झाली .पंचनामा नंतर तुमसर उपजिल्हा शासकीय दवाखान्यात शववीच्छेदन करण्यासाठी मृतदेह आणण्यात आले. पण या दवाखान्यात नवीन अध्याय सुरू झाला मृत्यूच्या कुटुंबियांना दवाखान्याच्या पोस्टमार्टम कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी चक्क कुटुंबाला 2500 रुपये ची मागणी केली. ह्यात आम्ही सामान देऊ आणि गुंडाळून देऊ नाहीतर पोस्टमार्टम झाल्यावर मृत्यू असाच घेऊन तुम्हाला जावे लागेल .जर तुम्ही सामान आणले तर आम्ही गुंडाळुन देणार नाही .ते तुम्हालाच गुंडाळावा लागेल अशा प्रकारची धमकी भरलेले शब्द त्यांना सांगण्यात आले .एकही अधिकाऱ्यांनी त्या गरीब लोकांची काही मदत केली नाही. कसेबसे करून नातेवाईकाकडून पैसे गोळा करून मृतदेहाला लागणारे साहित्य त्यांनी बाजारातून घेऊन आणले आणि स्वतःच्या हातांनी गुंडाळले .मृतददेह त्यांनी घरी नेले. दवाखान्याच्या कर्मचाऱ्यांनी अमाणुकीच्या उदाहरण प्रस्तुत केला मात्र अधिकारी पूर्ण झोपेत असता किंवा कोणतीही सतर्कता दाखविले नाही आणि गरीब लोकांना कोणत्याही प्रकारचे दया न दाखवून अधिकाऱ्यांनी आपली निष्क्रियता सिद्ध केली. शासकीय दवाखाना चे अधिकारी आणि शविच्छेदन कक्षाचे कर्मचारी यांना निलंबित करण्यात यावेअशी मागणी आंबागड गावकरी यांची आहे. आणि तरीही या क्षेत्रातील सर्वत्र लोकांनी या घटनेची निंदा केलेली आहे. मृत आत्मा दुःखी आणि कर्मचारी सुखी जय महाराष्ट्र.





Total Users : 880467
Total views : 6484722