
तुमसर :रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जी कारभारामुळे नागपूरहून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले आहे. नागपूर स्थानकावरून सुटणारी हमसफर एक्सप्रेस (गाडी क्रमांक 22142) अचानकपणे अजनी स्थानकावरून सोडण्यात आली. त्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांची व्यवस्था करून नागपूरहून अजनीपर्यंत प्रवास करावा लागला.

तक्रारदार अनिल वासुदेव कारेमोरे (वय 52) यांच्यासह एकूण पाच प्रवाश्यांनी 3rd ए सी चे रिजर्वेशन केले होते.
रेल्वेने कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक गाडी अजनीवरून सोडल्यामुळे प्रवाश्यांना अनावश्यक खर्च, वेळेचा अपव्यय आणि मानसिक त्रास सहन करावा लागला. यासंदर्भात कोणताही SMS अलर्ट, फोन कॉल किंवा पर्यायी वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली नव्हती, अशी माहिती तक्रारदारांनी दिली. या प्रकरणी अनिल कारेमोरे यांनी रेल मंत्रालयाकडे शुक्रवार ११ जुलै ला तक्रार दाखल केली असून या तक्रारीला MORLY/E/2025/0023660 हा क्रमांक देण्यात आला आहे. त्यांनी तक्रारीत झालेल्या अतिरिक्त खर्चाची भरपाई, अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ठोस उपाययोजना आणि तातडीने लेखी उत्तर देण्याची मागणी केली आहे.
कारवाई न झाल्यास प्रवासी संघटनांच्या माध्यमातून ही बाब न्यायालयात नेण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. या घटनेमुळे नागपूर रेल्वे प्रशासनाच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.





Total Users : 883186
Total views : 6488654
