
गोंदिया-भंडारा लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत यादवरावजी पडोळे यांनी संसद भवनात केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री माननीय श्री. भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन क्षेत्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मागणीपत्र सादर केले. या मागणीपत्राद्वारे खासदार डॉ. पडोळे यांनी गोंदिया-भंडारा येथील अमूल्य नैसर्गिक संपत्ती — सघन जंगल, जैवविविधता, आदिवासी समाज व टायगर रिझर्व्ह — यांचे संवर्धन करताना शाश्वत विकासाच्या दिशेने पुढे जाण्यासाठी ठोस सूचना मांडल्या.
खासदार डॉ. पडोळे यांनी मंत्री महोदयांसमोर पाच महत्त्वाचे प्रस्ताव ठेवले :
🌱 जैवविविधता उद्यान व पर्यावरण अभ्यास केंद्र – संशोधन, अभ्यास व संवर्धनाला नवीन दिशा देण्यासाठी।
🌱 इको-टुरिझमचा प्रसार – स्थानिक युवकांना रोजगार व क्षेत्राला राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळण्यासाठी।
🌱 CAMPA निधीतून वनीकरण व जलसंधारण प्रकल्प – हिरवाई वाढवण्यासाठी व जलसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी।
🌱 आदिवासी हक्कांची मान्यता जलद गतीने – वनहक्क कायदा 2006 चे प्रभावी अंमलबजावणीसाठी।
🌱 क्लायमेट रिसिलिएंट झोनचा विकास – हवामान बदलाचा प्रभाव कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना।
माननीय केंद्रीय मंत्री श्री. भूपेंद्र यादव यांनी खासदार डॉ. पडोळे यांच्या दूरदृष्टीपूर्ण विचारांचे कौतुक केले व मंत्रालयाकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.
ही पुढाकार गोंदिया-भंडारा क्षेत्राला आदर्श संतुलित विकास मॉडेल म्हणून घडवेल, जिथे पर्यावरण संवर्धनासोबत स्थानिक समाजाचा सर्वांगीण विकास साधला जाईल.





Total Users : 883092
Total views : 6488527
