
तुमसर: बैल पोळा निमित्त शहर वार्ड पोळा समिती व लायन्स क्लब गोल्डन च्या संयुक्त विद्यमाने तुमसर येथील शहर वार्ड येथे बैल पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी उत्कृष्ट सजावट केलेल्या जोडीला प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाचे पारितोषिक ठेवण्यात आले होते या निमित्ताने तुमसर-मोहाडी विधानसभा प्रमुख इंजि.प्रदीपजी पडोळे यांच्या कडून स्वर्गीय मोतीरामजी पडोळे यांच्या स्मृती मधे प्रथम क्रमांकचे पारितोषिक सुनीलजी पारधी यांच्या कडून द्वितीय क्रमांकचे तसेच अंकुशजी राऊत यांच्या कडून तृतीय क्रमांक चे पारितोषिक ठेवण्यात आले होते यावेळी प्रथम,द्वितीय,तृतीय क्रमांक पटकावणार्या बैल जोडीला वरील मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले या वेळी पोळा समितीचे सदस्य लायन्स क्लब गोल्डन चे पदाधिकारी व शहरातील गण मान्य नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.






Total Users : 883180
Total views : 6488646
