
भंडारा: देशभक्तीचा उत्साह आणि तिरंग्याची शान अनुभवण्यासाठी शुक्रवार दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी स्थानिक दि रॉयल गोंडवाना पब्लिक स्कूल, गुरुनानक वॉर्ड ,सिंधी कॉलनी रोड ,भंडारा. येथे सकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी पावसाच्या उपस्थितीत ध्वजारोहण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून श्री. मच्छिंद्र पंचबुद्धे हवालदार आर्टिलरी रेजिमेंट नवी दिल्ली, सौ. ज्योती अय्यर अध्यक्ष दी रॉयल गोंडवाना पब्लिक स्कूल, नागपूर भंडारा, श्री. सूरज अय्यर सचिव दी रॉयल गोंडवाना पब्लिक स्कूल नागपूर भंडारा , डॉ. श्री . नंदलाल चौधरी, संचालक, दी रॉयल गोंडवाना पब्लिक स्कूल नागपूर ,तसेच शाळेचे प्राचार्य श्री अंकुश अ. अ. मुळे सर प्रामुख्याने उपस्थित होते. ध्वजारोहणा नंतर विद्यार्थ्यांचे देशभक्तीपर गीत ,नृत्य तसेच संस्कृत, मराठी, हिंदी या भाषेमधून भाषण झाले . याप्रसंगी विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरण्याने विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. सर्व मान्यवरांनी उपस्थित सर्वांना स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना खाऊ वाटून कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमात विद्यार्थी, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






Total Users : 883068
Total views : 6488500
