
तुमसर: माकडे नगरातील रामजी गणेशा शाळेच्या परिसरात हनुमान मंदिराजवळ दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सार्वजनिक तानहापोळ्याचे आयोजन करण्यात आले होते. तान्हा पोळ्यात नंदी सजावट करून मोठ्या प्रमाणात बालगोपालांनी सहभाग नोंदवत तान्हा पोळ्यात आपली हजेरी लावली. याप्रसंगी तान्हा पोळ्यात नंदी सजावट व वेशभूषा धारक बालगोपालांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या नंदी धारक बालगोपालांचे निरीक्षण सेवानिवृत्त ज्युनिअर इंजिनिअर प्रसिद्ध कवी प्रमोद शाहू व आर्टिस्ट अशोक पारधी यांनी निरीक्षण करत बालगोपालांचा निकाल दिला. कार्यक्रमाला प्रामुख्याने माजी नगरसेवक सुनील लांजेवार, प्रमोद लांजेवार ललित शुक्ला,मुकेश सहारे,शोभा सहारे,शोभा लांजेवार,उपाध्ये मॅडम उर्मिला राजगिरे, नूतनताई भोले, छाया लांजेवार, व स्नेह नागरी पतसंस्थेचे उपाध्यक्ष सुरेश समरीत प्रामुख्याने उपस्थित होते. तान्हा पोळ्यात उपस्थित सर्व बालगोपालांना ईश्वरचिठ्ठीने सुद्धा दहा बक्षिसे देण्यात आली व निरीक्षकांनी केलेल्या नंदीबैलांचे दहा पारितोषिक देण्यात आली पारितोषिकामध्ये रोख रक्कम व भेटवस्तू देण्यात आल्या. व इतर उपस्थित बालगोपालांना भेट वस्तू व चॉकलेट चे वाटप करण्यात आले.बालगोपाळांच्या पालकांनी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या पाल्यांचे नंदीबैल पाहण्यासाठी गर्दी केली होती. याप्रसंगी स्नेह नागरी पतसंस्थेकडून व दुलीचंदजी निखाडे यांच्यावतीने सर्व बालगोपालांना रोख,भेटवस्तू व बक्षिसे देण्यात आली. याप्रसंगी जेष्ठ पत्रकार गणेशराव बर्वे यांनी सुंदर असे बालगोपाल व त्यांच्या पाल्यांना मार्गदर्शन करत ज्याप्रमाणे आपण आपल्या पाल्यांचे नंदी सजावट करण्यास सहकार्य केले तसेच सहकार्य त्या बालगोपाल यांच्या जीवनात, शिक्षणात मार्गदर्शन करून त्यांचे उज्वल भविष्य करण्याचे आव्हान पालकांना यावेळी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल कारेमोरे यांनी केले तर आभार शोभाताई लांजेवार यांनी केले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जितू आंभीलधुके, लीलाधर जांगडे,महेश राऊत, शेरू बुराडे, किशोर चोपडे,गणेश पवार,राकेश चारमोडे, शैलेश धुर्वे, श्रीकांत धुर्वे,भाऊराव धुर्वे,मारुती समरीत यांनी अथक प्रयत्न केले. व तान्हा पोळा सम्पन्न करण्यात आला.






Total Users : 883180
Total views : 6488646
