
गोंदिया: राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते माजी आमदार व गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री राजेंद्रजी जैन यांचा वाढदिवस ८ आगष्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तथा मित्र परिवाराच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्त गौ माता पूजन, गोंदिया शहर व जिल्ह्यात ठीक ठिकाणी आरोग्य शिबीर, नेत्ररोग शिबिर, रोगनिदान शिबीर, वृक्षारोपण, फळ वितरण व शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप या सह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. त्याच बरोबर गोंदिया शिक्षण संस्था द्वारा संचालित शैक्षणिक संस्थांचे वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजित करण्यात आले आहे. माजी आमदार श्री राजेंद्रजी जैन शुभचिंतकांच्या शुभेच्छा घेण्याकरिता एन.एम.डी महाविद्यालयाच्या प्रागंणात सकाळी ९.३० वाजे पासून उपस्थित राहणार आहेत.





Total Users : 883121
Total views : 6488562
