
◆ सहकार महर्षी स्व.यादवरावजी पडोळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ भंडारा, गोंदिया जिल्ह्यात विविध ठिकाणी फळ वाटप, वृक्षारोपण केले
◆ अनेकांनी दिला त्यांच्या कार्याचा उजाळा
◆ प्रत्येकाच्या मनात एकच शब्द होते आज पडोळे साहेब असते तर
◆ पडोळे साहेब एक होते पण नेक होते…
भंडारा/गोंदिया :- सहकार महर्षी स्वर्गीय यादवरावजी पडोळे यांच्या 22 व्या स्मृतिदिनानिमित्त भंडारा,गोंदिया जिल्ह्यातील सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, तथा विविध ठिकाणी, ग्राम पंचायत, गावात, शहरात वृक्षारोपण करण्यात आले. भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी वडिलांचे विचार घेऊन समाज सेवा करत आहेत. त्यांचे कार्य समाज हिताचे आहेत. क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहिले आहेत. प्रत्येक समाजातील जनसामान्यांच्या मनात आजही स्वर्गीय यादवरावजी पडोळे साहेब, जिवंत आहेत. ते बीडीसी बँक, आणि किसान दूध संघाचे अध्यक्ष असतांना सामान्य व्यक्ती ते शेतकऱ्यांचा कसा विकास होईल याकडे लक्ष द्यायचे. समाजातील माणसाचा कसा विकास होईल त्याच्या हाताला कसे काम देता येईल, याकडे नेहमीच लक्ष ठेवून पुढाकार घेत असत. आणि त्यांनी त्यावेळी करून दाखविले आहे. त्यांच्या कार्याचा उजाळा आज प्रत्येक समाज बांधव देत आहे. बोलत आणि तेच करून दाखविण्याचे धाडस सहकार महर्षी स्व.यादवरावजी पडोळे साहेब यांच्या मध्ये होते. सामान्य व्यक्ती, शेतकरी, शेतमजूर, कामगार अन्य कोणीही असो यांना सरळ हाताने मदत करित असत. आजही त्यांना मानणारा वर्ग समाजात दिसून येत आहे. आणि त्यावेळी त्यांनी समाज हिताचे कार्य करून दाखविले.
सहकार महर्षी स्व. यादवरावजी पडोळे यांचे कार्य पुढे नेण्यासाठी, समाजाच्या आणि मतदार संघाचा सर्वांगीण विकासासाठी भंडारा,गोंदिया जिल्ह्यातील जनतेनी चांगल्या विचाराचा कौल देत, एका उच्च शिक्षित व्यक्तीची निवड करत सन 2024 मधे सहकार महर्षी स्व.यादवरावजी पडोळे यांचा मुलगा डॉ.प्रशांत यादवरावजी पडोळे यांना लोकसभेत पाठविलेत. हे कोणीही विसरू सहजासहजी विसरू शकत नाही. त्यांच्या कार्याला उजाळा देत गुरुवार दिनांक 21 आगस्ट 2025 ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी जिल्हा भंडारा, गोंदिया,शुभचिंतक, सामाजिक संघटना, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, गावकरी यांनी जिल्हयातील सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्राम पंचायत, तसेच परिसरातील विविध ठिकाणी फळ वाटप, वृक्षारोपण, आणि गरजूंना मदत करण्याचे कार्य यावेळी केलेत.
पण सर्वांच्या मनात, विचारात एकच वाक्य, एकच शब्द होते ते म्हणजे पडोळे साहेब आज असते तर…
या दोन्ही जिल्हयातील समाजाचा, क्षेत्राचा सर्वांगीण विकास झाला असता…आज आपला गोर, गरीब, शेतकरी, शेतमजूर, दूध उत्पादक, कामगार बऱ्याच ठिकाणी अडचणीत आहे. बऱ्याच शासनाच्या योजनेपासून वंचित आहे. त्यांना न्याय देण्यासाठी भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत यादवरावजी पडोळे यांनी कंबर कसली आहे. दिल्लीच्या शासन दरबारी आवाज उचलण्यासाठी कुठेही मागे पुढे पाहणार नाही आहेत.आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर आहेत.
लेखक:- उमेश मोहतुरे





Total Users : 883108
Total views : 6488546
