
तुमसर: सैय्यद शाह शैदाये दर्गाशरीफ भाजी मंडी कामठी येथे सालाना उर्स शुक्रवार दि. ८ ऑगस्ट ते दि.१० ऑगस्ट पर्यंतचे आयोजन करून तीन दिवसीय उर्स साजरा करण्यात येणार आहे. भाजी मंडी कामठी येथील सैय्यद शाह शैदाये दर्गाशरीफ येथे शुक्रवार दि. ८ ऑगस्ट २०२५ ला सकाळी ज़ियारते तबर्रुकात, गुस्ल मजार शरीफ बाद कुरानखानी. बाद नमाज़े ज़ोहर परचम कुशाई, दुपारी २:३० वाजता संदल शरीफ, बाद नमाजे, असर मिलाद शरीफ व रात्री ८ वाजेपासून “मटका पार्टी, चे आयोजन केले आहे.तर दि. ९ ऑगस्ट रोज शनिवारला सकाळी ६ वाजता कुरातरद्वाजी, दुपारी १:०० वाजे पासून आम लंगर, तर रात्री ८ वाजे पासून कव्वाल अजीम नाजा यांची “शानदार कव्वाली ” चा कार्यक्रम आयोजित केला आहे.तसेच दि.१० ऑगस्ट रोज रविवार ला सकाळी ५ वाजता कुरान खानी आणी उर्सची समाप्ती होणार आहे.
सैय्यद शाह शैदाये दर्गाशरीफ येथे दर वर्षी प्रमाणे यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार असल्याचे उर्स कमेटी चे मुख्य आयोजक व गद्दीशीन किशोरी बाबा यांनी कळविले आहे.





Total Users : 879191
Total views : 6482614