
तुमसर: विधानपरिषद सदस्य डॉ. परिणय फुके यांच्या सोबत तुमसर- मोहाडी विधानसभा प्रमुख तसेच भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष इंजि. प्रदीप पडोळे यांनी नागपूर येथील रामगिरी निवास स्थानी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याची सदिच्छा भेट घेतली.
याप्रसंगी मुख्यमंत्र्यांसोबत जिल्हा बँक व तुमसर शहरातील व विधानसभा क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष विलास काटेखाये, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक रुबी चड्हुडा, धर्मराज भलावी, संदीप फुंडे आदी उपस्थित होते.






Total Users : 883178
Total views : 6488644
