
भंडारा: संगणक शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुडलक कम्प्यूटर क्लासेस या स्थानिक संस्थेने आणखी एक नवा टप्पा गाठला आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी भारतातील टॉप 100 संगणक प्रशिक्षण संस्थांमध्ये या संस्थेची निवड झाली असून, संस्थेला “India’s Top 100 Institute” हा राष्ट्रीय बहुमान प्राप्त झाला आहे.
हा पुरस्कार नागपूर येथे झालेल्या भव्य सोहळ्यात प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात सन 2004 मध्ये फेमिना मिस इंडिया वर्ल्ड किताब जिंकलेली नामांकित सिने अभिनेत्री सायली भगत , तसेच AICPE नागपूर चे डायरेक्टर श्री. शरद तावोरी व सौ. कविता तावोरी यांच्या हस्ते संस्थेचे डायरेक्टर श्री. प्रवीण रा. मोहबे यांना गौरवण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासून भंडारा शहरात गुडलक कम्प्यूटर क्लासेस ही संस्था संगणक शिक्षण व तांत्रिक कौशल्य विकासासाठी सातत्याने काम करत आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आधुनिक कोर्सेस, दर्जेदार प्रशिक्षण या माध्यमातून ही संस्था जिल्ह्यातील तरुणांना स्पर्धात्मक युगात पुढे नेण्याचे काम करत आहे.





Total Users : 883068
Total views : 6488500
