
इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क प्रतिनिधि/ उप-संपादक/ अॅड. रोहित बोंबार्डे
तुमसर : तालुका विधी सेवा समिती, तुमसर यांच्या वतीने शनिवारी दुपारी तालुका न्यायालय परिसरात विशेष कायदेशीर शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आर. पी. बाठे यांनी भूषविले.आपल्या मार्गदर्शनात त्यांनी “न्यायालयीन प्रक्रियेपेक्षा मध्यस्ती हा उत्तम पर्याय असून यात वेळ, पैसा व मानसिक ताणाची बचत होते” असे अधोरेखित केले. यावेळी वरिष्ठ नागरिकांचे अधिकार या विषयावर अॅड. मेहर यांनी माहितीपूर्ण मार्गदर्शन केले.
१ जुलै २०२५ पासून पुढील ९० दिवस विशेष मध्यस्थी मोहीम राबविण्यात आली होती.त्या दरम्यान मध्यस्ती विभागाकडे असलेल्या प्रकरणांमधून १५ प्रकरणे परस्पर सामंजस्याने सोडविली गेल्याची माहिती यावेळी देण्यात आली.कार्यक्रमात तालुका वकील संघाचे सचिव अॅड. विजय पारधी, वकील बांधव, पक्षकार तसेच न्यायालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिराच्या यशात सहायक अधीक्षक चकोले, भोगे, वरिष्ठ लिपिक शंभरकर, डोंगरे, कनिष्ठ लिपिक सूर्यवंशी, हुमणे, भुरे, वानखेडे, शिपाई कोकासे व जामोदे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. शिबिराचे संचालन अॅड. शाहू यांनी केले.आयोजकांच्या मते या उपक्रमातून “नागरिकांच्या दारी न्याय पोहोचविण्याचा प्रयत्न साधला गेला.





Total Users : 883062
Total views : 6488494
