
तुमसर: आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना योग्य दिशा, प्रेरणा आणि आत्मविश्वास मिळावा या उद्देशाने आयोजित “विद्यार्थी व युवक मार्गदर्शन सोहळा” हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून प्रा. नितेश कराळे सर यांनी विद्यार्थ्यांना करिअर नियोजन, स्पर्धा परीक्षांची तयारी, आणि जीवनमूल्यांविषयी आणि अन्यायाच्या विरोधात आपली न्यायिक बाजू मांडण्यासाठी सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देश ठरवून आत्मविश्वासाने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. त्यांच्या प्रभावी वक्तृत्वाने सभागृहातील सर्व विद्यार्थी, पालक व उपस्थित मान्यवर प्रेरित झाले. या मार्गदर्शन सोहळ्यास मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक व युवक उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना प्रा. कराळे सरांनी सविस्तर उत्तरे देऊन मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे आयोजन श्री.चरण भाऊ वाघमारे माजी आमदार तसेच जिल्हाध्यक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट), भंडारा जिल्हा व NCPSP तुमसर शहर यांच्या पुढाकाराने करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की,
“विद्यार्थी वर्गाने आजच्या काळात तंत्रज्ञानासोबत संस्कार, मूल्ये आणि कष्ट यांचा संगम साधला पाहिजे. हाच खरा यशाचा मंत्र आहे.”
🎓 विद्यार्थ्यांना सल्ला दिला की, प्रिय विद्यार्थ्यांनो, आजच्या स्पर्धेच्या युगात केवळ गुण नव्हे, तर दृष्टीकोन, प्रयत्न आणि संयम हेच यशाचे खरे आधार आहेत. जीवनात मोठं व्हायचं असेल तर तीन गोष्टी कायम लक्षात ठेवा —
1️⃣ ध्येय ठरवा: स्वतःचा मार्ग स्वतः तयार करा. इतरांशी तुलना न करता आपल्या क्षमता ओळखा.
2️⃣ कष्ट आणि शिस्त: शॉर्टकट नाही, तर सातत्यपूर्ण प्रयत्न आणि आत्मविश्वास हाच यशाचा महामार्ग आहे.
3️⃣ सद्गुण आणि संस्कार: बुद्धिमत्ता महत्वाची आहेच, पण चांगला माणूस होणं अधिक महत्वाचं आहे. नम्रता, आदर आणि सहकार्य हीच खरी शिक्षणाची ओळख आहे.
प्रत्येक अपयश ही यशाची पायरी आहे — आत्मविश्वास ठेवा, प्रयत्न करत राहा आणि आयुष्यात स्वतःचं यशस्वी उदाहरण घडवा. 🌟
🙏 कार्यक्रमाचे विशेष आभार :
मानताना संताजी स्नेही समाज मंडळ, तुमसर तसेच सर्व मान्यवर, पालक व विद्यार्थी वर्ग यांचे मनःपूर्वक आभार देखील प्रगट करण्यात आले. आयोजक म्हणून श्री. चरणभाऊ वाघमारे (माजी आमदार तसेच जिल्हाध्यक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट), भंडारा जिल्हा व NCPSP तुमसर शहर यांच्या मोठ्या टीम वर्क च्या मेहनतीने कार्यक्रम यशस्वी झाल्याचे सांगीतले. यावेळी,कार्यक्रमाचे अध्यक्ष शहरातील करिअर अकादमी चे संचालक श्री रवी जी वाघमारे सर,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष (NCPSP) चे पदाधिकारी गौरव नवरखेले, विजयश्रीताई वाघमारे,रानी ताई ढेंगे, मिनलताई कारेमोरे, नितेश मारवाडे, गीतेश ठोंबरे,विजय रहांगडाले, तालुकाध्यक्ष छोटु भाऊ तुरकर,अनिल जिभकाटे ,मेहताबसिंग ठाकूर, जवाहर कुंभलकर,शहर अध्यक्ष हेमराज नागफासे, अरुण मोखारे,योगेश रंगवाणी, शेखर बिसेन,अविनाश उपरीकर, उमेश बघेले,भाऊलाल बांडेबुचे, फुकट हिंगे,प्रवीण कहालकर, अजय बडवाईक, सोनाक्षी बडवाईक,डॉ.घनश्याम मडावी,हेमंत मलेवार, राजू बडवाईक, नावेद शेख, सागर बिसने, विनोद उपरीकर,सचिन बडवाईक, प्रदीप हुड, किशोर जी माटे,सुशांत देशमुख, सोहनलाल हट्टेवार, रिनाताई माटे,सुलभाताई हटवार, बालचंद बोंद्रे, शालुताई वहाने, सानियाताई घोडीचोर, पंकज राठोड,राकेश कोहाड, राकेश भेलावे,मानापूरे, मुकेश वाघमारे सर, रवी समरीत, ॲड योगेश आजापुजे,तसेच सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









Total Users : 883068
Total views : 6488500
