
इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क प्रतिनिधि/ उप-संपादक/ राहुल भुतांगे
तुमसर : मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे भंडारा जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. विशेषतः तुमसर तालुक्यात सतत पाऊस व अतिवृष्टीमुळे धान पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून बळीराजाचे कंबरडे मोडले आहे. शेतकऱ्यांचे संपूर्ण धान पिक झोपून व लोंबून गेलेले दिसत आहे. सप्टेंबर महिन्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे हलक्या व जड धानावर तुळतुळा, खोळकिळा, करपा अशा रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
ओल्या दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, शासनाने तातडीने शेतीचे पंचनामे करून मदतीची घोषणा करावी, अशी मागणी होत आहे. शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करून दिलासा देणे, कर्जाचा भार कमी करणे तसेच उन्हाळी धान व बोनसची रक्कम वेळेवर मिळावी, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.दरम्यान, दिवाळी जवळ आल्याने बळीराजाला शासनाने वेळेत मदत केली तरच शेतकरी सुखाने सण साजरा करू शकेल अन्यथा शेतकऱ्यांचा दिवाळीत दिवाळा निघून त्यांच्या कडे आत्महत्या शिवाय पर्याय उरणार नाही.
कर्जाच्या डोंगरामुळे आधीच शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यात भरीस भर म्हणून सप्टेंबर महिन्यात आलेला अवकाळी पाऊस, धानावरील रोगांमुळे हाती आलेला पीक ही गेले. त्यावर दिवाळी सारखा सण परिणामी शासनाने तत्काळ ओला दुष्काळ घोषित करावा. अन्यथा मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागेल.
ठाकचंद मुंगूसमारे – सामाजिक कार्यकर्ता





Total Users : 883062
Total views : 6488494
