
“राष्ट्रवादी कांग्रेस ची जन सन्मान यात्रा “या लोकाभिमुख संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवित महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री,निर्णयांचा वेग आणि कामाचा धडाका यांचे दुसरे नाव —आदरणीय मा. अजित दादा पवार यांनी तुमसर नगरीत पदस्पर्श केला आणि तुमसरची भूमी अक्षरशः पावन झाली. हा केवळ दौरा नव्हता. होता सत्तेचा नव्हे, सेवाभावाचा घोष. शब्द कमी, निर्णय जास्त — हीच दादांची ओळख..जिथे अनेक नेते केवळ आश्वासनांच्या पावसात सभा आटोपतात,तिथे अजित दादा फायली उघडतात, निर्णय घेतात आणि अंमलबजावणीचा हिशेब मागतात.नेहरू ग्राउंड, तुमसर येथील तो मंच त्या दिवशी केवळ व्यासपीठ नव्हता—तो होता जनतेच्या प्रश्नांना थेट भिडणाऱ्या नेतृत्वाचा रणांगण. या मंचावर उपस्थित होते —तुमसर–मोहाडी विधानसभा क्षेत्राचे कणखर आमदार राजूभाऊ कारेमोरे,
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ, राष्ट्रीय नेतृत्व, खासदार मा. प्रफुल्लभाई पटेल, माजी आमदार राजेंद्र जैन व इतर पदाधिकारी.या मान्यवरांच्या उपस्थितीने सभेला लाभली राजकीय धार, प्रशासकीय ताकद आणि अनुभवाची खोली. शासन आपल्या दारी — घोषवाक्य नव्हे, कार्यसंस्कृती“शासन आपल्या दारी” हा कार्यक्रम कागदोपत्री नसून शासन थेट जनतेच्या दारी आणण्याची क्रांती आहे,आणि अजित दादा हेच या क्रांतीचे सेनापती आहेत.शेतकरी, कष्टकरी, युवक, महिला, व्यापारी —कोणाचाही प्रश्न मधे राहू नये,ही स्पष्ट भूमिका दादांनी तुमसरमध्ये मांडली.त्यांच्या प्रत्येक वाक्यात एकच संदेश ठासून भरलेला होता :“लोकांनी दार ठोठावायचं नाही,शासनच तुमच्या दारात येणार.”
स्थानिक नेतृत्वाला बळ, जनतेला विश्वास…आमदार राजूभाऊ कारेमोरे यांनी स्थानिक प्रश्न अत्यंत ठामपणे मांडत तुमसर–मोहाडीच्या विकासाची दिशा स्पष्ट केली.त्यावर अजित दादांची तत्काळ दखल ही केवळ राजकीय शिष्टाचार नव्हता—तो होता कामाला दिलेला शब्द. राष्ट्रीय नेते प्रफुल्लभाई पटेल यांचा अनुभवसंपन्न सहभाग. या कार्यक्रमाला वैचारिक खोली देणारा ठरला. तुमसरसाठी हा दौरा म्हणजे आशेचा नवा अध्याय… अनेक तरुणांच्या डोळ्यांत त्या दिवशी राजकारणाबद्दल नवी उमेद चमकली.कारण त्यांनी पाहिलं
निर्णय घेणारा नेता कसा असतो, आणि सत्ता लोकांसाठी कशी वापरली जाते. तुमसर नगरीत झालेला हा पदस्पर्श फक्त आठवण नाही,तो आहे विकासाच्या वाटेवर टाकलेलं ठाम पाऊल.दि. २० नोव्हेंबर २०२३ हा दिवस तुमसर विसरणार नाही. कारण त्या दिवशी महाराष्ट्राचे दादा तुमसरमध्ये आले नव्हते— तर तुमसरच्या प्रश्नांना सोबत घेऊन गेले होते.अशा नेतृत्वाला सलाम नाही तर भक्कम साथ देणं, हेच त्यांच्याप्रती खरं अभिवादन आहे.
बारामतीच्या मातीशी नातं जपणारा नेता त्याच बारामतीत विमान अपघातात हरपण हा केवळ योगायोग नाही, तो महाराष्ट्राच्या नशिबावर उमटलेला खोल घाव आहे. राजकारणातील स्पष्ट, निर्भिड व्यक्तिमत्व, प्रशासनावर लोखंडी पकड,, भल्या पहाटेला कामाला लागणारा, धडाडीचा लोकनेता, महाराष्ट्राचा दादा ” हरपला “. महाराष्ट्राच्या राजकारणातील अपराजित ” दादा ” आज आठवणीत जिवंत राहिलेत… पण महाराष्ट्र पोरका झाला आहे… लोकनेता हरपला… महाराष्ट्राचा पोरका झाला आहे.” एकच वादा- अजित दादा “असे म्हणत आज शब्द थांबलेत.. डोळे पाणावलेत… आणि महाराष्ट्राचं हृदय जड झालंय…
” ये तो बताए हम तुम्हें भुलाए कैसे,और आपका चिराग बुझावु कैसे”? “महाराष्ट्राच्या दादाला” भावपूर्ण श्रद्धांजली!
…राहुल डोंगरे…“पारस निवास” शिवाजी नगर, तुमसर. जि. भंडारा. म. रा. मो. न.९४२३४१३८२६




Total Users : 881828
Total views : 6486787
