
भंडारा: 77 व्या गणतंत्र दिवस निमित्त लायन्स क्लब भंडारा सेंट्रल द्वारे क्लबचे अध्यक्ष, लॉ.पंकजकुमार राजाभोज, यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी लायन्स क्लब भंडारा सेंट्रल चे कॅबिनेट मेंबर लॉ.कुमार नशीने, कोषाध्यक्ष लॉ. विशाल भोंगाडे, लॉ.ऍडव्होकेट आर.सी.पशीने, लॉ. सचिन लेदे, लॉ. अरुण भेदे, इत्यादी क्लब सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नवी टाकळी, भंडारा येथील शिक्षक, विद्यार्थी, पालकवर्ग तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी ध्वजारोहणा नंतर राष्ट्रगीत जन गण मन म्हटले व राष्ट्रीय झेंड्यास सलामी देऊन, जयघोष केले. कार्यक्रमानंतर उपस्थित शालेय विद्ध्यार्थाना मिठाई व बिस्किट्स चे वाटप करण्यांत आले. कार्यक्रम संचालन लॉ. अरुण भेदे यांनी केले. विशेष करून कार्यक्रमानंतर उपस्थित मानवाईक व नागरीकांना चहा-नाश्त्याची सोय, लॉ.अरुण भेदे यांचे मार्फत करण्यात आलेली होती. त्यांनी सदर कार्यक्रमाला हजर असलेल्या सर्व उपस्थितांचे आभार मानले.





Total Users : 881828
Total views : 6486787
