
भंडारा: केंद्रीय अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी आज संसदेत सादर केलेला अर्थसंकल्प हा भविष्यातील भारताच्या बांधणीसाठी महत्वाचा ठरणार आहे. विशेष म्हणजे मुलींसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह बांधण्याची घोषणा मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणारी आहे. महिलांसाठी स्वतंत्र मॉल तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना उद्योग व रोजगारात संधी मिळणार आहे. शेतकऱ्यांसाठी त्यांचे उत्पन्न कसे वाढणार, याकडे लक्ष देण्यात आले आहे.
कृषी क्षेत्रासाठी विशेष पॅकेजची घोषणा करण्यात आली असून, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. प्राप्तिकरातील सवलत ही स्वागतार्ह बाब आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या हातात खर्च करण्यासाठी पैसा राहील, ज्याचा थेट फायदा स्थानिक बाजारपेठेला आणि व्यापाराला होईल, कौशल्य विकासासाठी केलेली तरतूद ग्रामीण भागातील तरुणांसाठी संधी निर्माण करणारी आहे. सहकारी बँका आणि सोसायट्यांना बळकट करण्यासाठी घेतलेले निर्णय ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मजबूत करणार आहे. ग्रामीण पायाभूत सुविधांचा विकास आणि डिजिटल शेतीवर दिलेला भर भविष्यात नक्कीच फायदेशीर ठरणार आहे, असे आमदार डॉ. परिणय फुके यांनी नमूद केले.





Total Users : 883054
Total views : 6488485
