
तुळजापूर: मधे गौड-कलाल समाज स्नेहसंम्मेलन कार्यक्रम मधे राज्य आणि परराज्यामधील समाज बांधवांनीं खुप मौठ्या संख्येनी उपस्थित राहून आम्ही आता एक आहोत ,एकत्र ,एकजुट आहोत हे दाखवून दिले …दरम्यान काल समाजातील सर्व स्त्री-पुरुष बंधू आणि भगिनींनी प्रथम आपले आद्य देव आणि आद्य पुरुष यांच्या प्रतिमेची वाजत गाजत मिरवणूक काढली …
यानंतर सरदार सर्वई श्री पापन्ना गौड महाराज यांच्या शूरकथे वर आधारित सुंदर कार्यक्रमाचे मंचन झाले ..यामुळे आपल्या लोकांना आपल्या आदर्श पुरुषांचां आणि आपल्या समाजाचा इतिहास समजण्यात मदत झाली … यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाला शुरुआत झाली .. आपले मनोगत व्यक्त करताना सर्वच वक्त्यांनी समाजाच्या ऐकीसाठी ,उन्नतीसाठी ,प्रगतीसाठी आप-आपले विचार मांडले .. कार्यक्रमाच्या दूसर्या सत्रात वधू-वर परिचय मेळाव्यात अनेक मुला-मुलींनी स्टेजवर येवून आप आपला परिचय दिला ….
राज्यातील मागील सर्व कार्यक्रम पाहता कालच्या कार्यक्रमामधे आपल्या समाजातील स्त्री पुरुषांनी गर्दीचा उच्चांक मोडळा ..अभूतपूर्व अशी गर्दी झाली ..परंतू सर्व काही अगदी शिस्तबद्ध पद्धतीने समाजबांधवांनी कार्यक्रमाला प्रतिसाद दिला …
एकूणच कार्यक्रमामधून अस जाणवला की आपला समाज आता जागृत झाला आहे ..तो एक होवू पाहतोय ..आणि हीच काळाची गरज आहे .. कार्यक्रमामधे खुप गर्दी असल्याने आणि वेळ शिल्लक नसल्याने अनेक समाजबंधू भगिनींचे सम्मान करायेचे राहून गेले .त्यासाठी आम्ही सर्वजण क्षमाप्रार्थी आहोत ..
शेवटी कार्यक्रमात उपस्थित राहिलेल्या सर्वच समाजबंधूंचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो ..धन्यवाद देतो..लवकरच आपण सर्व परत एकदा खुप मोठ्या संख्येने भेटणार आहोत …कारण आपल्या समाजातील खुप प्रश्नांचे उत्तरे आपल्याला शोधायची आहेत ..
जय गौड, जय जय गौड, सोलापूर,धाराशिव, लातूर गौड समाज स्नेह सम्मेलन कार्यक्रम समिती





Total Users : 882487
Total views : 6487764
