![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
संचालक/ गोंदिया/ संदेश मेश्राम
देवरी :डवकी – सीलापूर रस्त्यावर डवकी शिवारा नजीक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भात रोवणी करणाऱ्या महिला शेतमजुरांचे पिकप वाहन उलटल्याने घडलेल्या अपघातात 34 महिला जखमी झाल्या .तर यातील 14 महिलांना गोंदिया येथे रेफर करण्यात आले आहे तर उर्वरित वीस महिलांचा उपचार देवरी ग्रामीण रुग्णालयात सुरू आहे .देवरी पोलिसांनी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्राप्त माहितीनुसार बोरगाव येथील 34 महिला शेतमजूर १० की.मी.अंतरावर असलेल्या फुक्कीमेटा येथील संतोष ब्राह्मणकर यांच्या शेतात पिकप वाहन क्रमांक MH 33-0595 ने भातरोवणी करण्याकरिता जात असताना आज शुकरवारला सकाळी दहा वाजता दरम्यान डव की गावाजवळ वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकप वाहन शेजारील शेतात जाऊन उलटले यात सवार 34 ही महिलांना दुखापत झाली असून त्यांना प्राथमिक उपचाराकरिता देवरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या 34 महिला पैकी 14 महिलांना डोक्याला व छातीला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी गोंदिया येथे पाठविण्यात आले .तर या दुर्घटनेत चालक प्रवीण विनायक राऊत हा सुद्धा जखमी झाला असून त्याच्यावर देवरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सुदैवाने या अपघातात जीवित हानी झाली नाही. जखमींच्या मदतीकरिता धावून आले माजी आमदार संजय पुराम डवकी गावाजवळ महिला मजुरांच्या दुर्घटनेची माहिती मिळताच माजी आमदार संजय पुराम यांनी पूराड्यावरून तात्काळ घटनास्थळ गाठले मजुरांची संख्या जास्त असल्याने ॲम्बुलन्स व्यतिरिक्त जखमी महिलांना त्यांनी स्वतःच्या वाहनात टाकून देवरी ग्रामीण रुग्णालय दाखल केले .यावेळी त्यांनी रुग्णालयात जखमींचे काळजीपूर्वक उपचार करण्याचे डॉक्टरांना सांगितले तसेच गोंदिया येथे रेफर करण्यात आलेल्या महिलांना तात्काळ उपचार देण्याचे डॉक्टरांना दुरध्वनी वरून कळविले व रुग्णांच्या परिवाराला त्यांनी धीर दिला .यावेळी सर्व पक्षाचे पदाधिकारी व इतर सामाजिक कार्यकर्ते सुद्धा मदतीला होते. अवैध वाहतुकीला आळा बसणार का? पावसाळा सुरू झाला असताना भातरोवणीच्या कामाला तालुक्यात वेग आला असून आपल्या शेताचे रोवने अगोदर आटोपवावे. याकरिता शेतमालक दुसऱ्या गावावरून मजुरांची बोलावणी करतात यामध्ये मजुरांना मजुरी व्यतिरिक्त त्यांच्या प्रवासाची सोय सुद्धा शेतमालकांना करावी लागते अशा शेतमालकांना मजुरांना आणण्याकरिता ट्रॅक्टर तसेच पिकप वाहनाचा सहारा घ्यावा लागतो परंतु एकाच वाहनात तीस तीस, चाळीस चाळीस मजुरांना कोंबून नेण्याचा प्रकार क्षेत्रात पहावयास मिळतो परंतु आरटीओ विभाग तसेच पोलीस विभाग यांची याकडे डोळे झाक होत असून आता तरी या दुर्घटनेनंतर प्रशासन या गंभीर बाबीकडे लक्ष देणार का? व अवैध वाहतुकीवर आळा घालणार का? हा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केलेला आहे. गोंदिया येथे उपचारासाठी पाठविण्यात आलेले रुग्ण. या दुर्घटनेत ३४ महिला जखमी झाल्या असून त्यापैकी गंभीर दुखापत झाल्याने १४ जणांना गोंदिया येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या मध्ये पुनम राऊत,केसर लांजेवार, फुलन घासले,सुनीता ठाकरे,मीराबाई शहारे,मिणा सोनवाने, सूधा साखरे,विपुला साखरे,सुनीता शहारे,महेश बालेवार,जयश्री लांजेवार, पारबता ताराम, प्रेरणा लांजेवार,संयोगिता नंदेश्वर,यांचा समावेश आहे