



तुमसर/ तुषार कमल पशिने
निवृत्त झालेल्या शिक्षकांना पुन्हा कंत्राटी तत्वावर सेवेत घेण्याचा शिंदे–फडणवीस सरकारचा निर्णय म्हणजे, बेरोजगारांचा गळा घोटण्याचा प्रकार आहे.
हजारो डीएड/बीएड झालेले बेरोजगार वर्षानुवर्षे शिक्षक बनण्याचे स्वप्न पाहात आहेत, आज ना उद्या सरकार शिक्षक भरती घेईल व आपल्याला शिक्षकाची नोकरी मिळेल या आशेने शासनाच्या आदेशाची वाट पाहात आहेत. पण त्याच शासनाने डीएड/बीएड बेरोजगारांच्या विरोधात निवृत्त शिक्षकांना कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्याचा आदेश काढून, बेरोजगारांचा गळा घोटण्याचा महापाप केलेला आहे.
हजारो डीएड/बीएड धारकांचा गळा घोटणाऱ्या सरकारने 7 जुलै 2023 रोजी काढलेला काळा जी आर रद्द करून, डीएड/बीएड धारक बेरोजगारांना नियुक्त करण्याची मागनी अरविंद येळने (वरठी शहर प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस) यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केलेले आहे.