![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
तुमसर/ तुषार कमल पशिने
शिक्षक संघ गोंदियाच्या वतीने आमदार विजय भाऊ रहांगडाले यांची ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांना निवेदन देऊन केली चर्चा
गोंदिया जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा संपकालीन 7,8 व 9 ऑगस्ट 2019 या तीन दिवसांचा वेतन कपात करण्यात आला होता. संपकालीन तीन दिवसाचे वेतन मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा गोंदिया व शिक्षक भारती गोंदियाच्या माध्यमातून वारंवार निवेदने देण्यात आली होती. तसेच शिक्षक संघाच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये तीन दिवसाचे वेतन देण्यासंबंधाने ठराव सुद्धा घेण्यात आलेला होता.
परंतु दिनांक 28 मे 2019 च्या महाराष्ट्र शासनाच्या पत्राने संपकालीन तीन दिवसाच्या रजा असाधारण रजा मंजूर झाल्याने तीन दिवसाचे वेतन मिळण्यासंदर्भाने शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर निर्माण झाला. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ गोंदिया ने आपला लढा निरंतर सुरू ठेवला.
यास्तव गोरेगाव तिरोडाचे आमदार विजय भाऊ रहांगडाले यांची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने भेट घेऊन आपली समस्या मांडली.तात्काळ आमदार विजय रहांगडाले यांनी पाठपुरावा करून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या टीम सोबत मंत्रालय गाठले.
ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांची निवास स्थानी भेट घेऊन तीन दिवसांच्या वेतनाचा व प्रोत्साहन भत्त्याच्या थकबाकीसाठी अनुदान देण्यासाठीच्या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांनी गोंदिया जिल्ह्याचा तीन दिवसांच्या वेतनाचा व प्रोत्साहन भत्त्याच्या थकबाकीसाठी अनुदान उपलब्ध करून देण्याचे आश्वासन शिक्षक संघाला दिले.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ गोंदिया व शिक्षक भारती गोंदियाच्या मागणीला यश मिळवून देण्याचा शब्द आमदार विजयभाऊ रहांगडाले यांनी दिला.
यावेळी शिक्षक संघ गोंदियाचे विभागीय अध्यक्ष शंकर चौहान, जिल्हाध्यक्ष किशोर बावनकर, राज्य कार्यकारिणी सदस्य उमाशंकर पारधी शिक्षक भारतीचे राज्य उपाध्यक्ष प्रकाश ब्राम्हणकार उपस्थित होते.