![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
तुमसर/ तुषार कमल पशिने
आज जनसंपर्क कार्यालय भंडारा येथे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा परिषद सदस्य गटाची बैठक माजी आमदार श्री राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष श्री नानाभाऊ पंचबुधे, श्री धनंजय दलाल यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
यावेळी भंडारा जिल्हयातील जिल्हा परिषद गटनेता व सर्व सदस्यांनी खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून यापूर्वी काम केलेले आहे आणि पुढेही निरंतर काम करु अशी ग्वाही सर्वांनी दिली. खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या नेतृत्वात जिल्ह्याच्या विकासाला साथ देत नव्या उमेदीने व उत्साहात सर्व मिळून पार्टी संघटन व पक्षाचा विस्तार करून पक्षाला मजबुत करण्याचे काम करु असा एकमताने निर्णय घेण्यात आला.
उपस्थितांमध्ये सर्वश्री राजेन्द्र जैन, नानाभाऊ पंचबुद्धे, धनंजय दलाल, अविनाश ब्राम्हणकर, राजु देशभ्रतार, राजेंद्र ढबाले, सुषमा छगनलाल पारधी, यशवंत सोनकुसरे, अनिता रमेश नलगोपुलवार, आनंद मलेवार, एकनाथ फेंडर, नरेश ईश्वरकर, महादेव पचधरे, रजनिश बन्सोड, नंदा नरेंद्र झंझाड, आशा डोरले, अस्मिता डोंगरे, दिपलता समरीत, लता नरुले, नरेंद्र झंझाड, छगनलाल पारधी, रमेश नलगोपुलवार, आरजु मेश्राम, राजेश डोरले, नंदू समरीत, विलास नरूले, प्रभाकर बोदले, हेमंत महाकाळकर, शेखर (बाळा) गभने, अमन मेश्राम व इतर पदाधिकारी उपस्थित होते.