![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
तुमसर/ तुषार कमल पशिने
पूर परिस्थितीच्या संभाव्य असलेल्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाची तयारी आणि इतर अन्य महत्त्वाच्या विषयाला घेऊन आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली गेली.
या बैठकीत पुर परिस्थिती हाताळताना मध्य प्रदेश आणि भंडारा जिल्हा प्रशासन यातील समन्वय, नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या गोष्टी यावर चर्चा झाली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जमीन हस्तांतरण आणि परवानगीच्या अनुषंगाने काही महत्त्वपूर्ण सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. शहरात भूमिगत गटार योजनेच्या कामामुळे रस्त्यांचा नागरिकांना होणारा त्रास पहाता दुरुस्तिच्या सूचना दिल्या.
धान खरेदीच्या अनुषंगाने ज्या शेतकऱ्यांनी धान विकले पण केंद्रातील घोळामुळे त्यांना पैसे मिळू शकले नाहीत, अशा शेतकऱ्यांना तत्काळ पैसे देण्याचे निर्देश यावेळी मी दिले.